मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळात काहीसं मंदावलेलं रिअल इस्टेट म्हणजेच मालमत्ता बाजार पुन्हा वेग धरु लागला आहे. सणासुदीच्या काळात खरेदी वाढल्याच्या आशादायी बातम्या येत असतानाच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केलेला अंदाज दिलासादायक आहे. त्यांच्यामते रिअल इस्टेट मार्केट २०३० पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. त्याचा देशाच्या जीडीपीतील हिस्सा १८ टक्क्यांवर पोहचू शकतो.
नीती आयोगाच्या सीईओंचा दिलासा देणारा अंदाज
- CIIच्या कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना कांत यांनी स्पष्ट केले की, गेले १८ महिने देश आणि अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक होते आणि रिअल इस्टेट क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते.
- रिअल इस्टेट क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मोठी भूमिका बजावते. २०३०पर्यंत रिअल इस्टेट मार्केट एक हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
- जे देशाच्या जीडीपीच्या १८ -२० टक्के असू शकेल.
संसर्ग घटतोय, मार्केट उसळेल!
- लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे आणि संसर्ग हळूहळू कमी होत आहे.
- रिअल इस्टेट क्षेत्र आणि त्याचे भागधारकही सरकारच्या सर्वांसाठी गृहनिर्माण उपक्रमाला पाठिंबा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
- देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आणि पर्यावरणाच्या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची मोठी भूमिका आहे.
- हे मार्केट २०३० पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि देशाच्या जीडीपी मध्ये १८ – २० टक्के योगदान देईल अशी अपेक्षा आहे.
- यामुळे येत्या काही वर्षांत १.२५ लाख कोटी रुपयांची संधी निर्माण होतील.