मुक्तपीठ टीम
भारतातील 5G नेटवर्कच्या लाँचिंगची वाट पाहिली जात आहे. त्याचवेळी दक्षिण कोरियन कंपनी एलजीनं मात्र 5G तंत्रज्ञानाला मागे टाकत पुढचे पाऊल उचलत आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने टेराहर्ट्झ स्पेक्ट्रम वापरून 6G डेटा ट्रान्समिशन यशस्वी झाल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या आठवड्यात बर्लिनमध्ये युरोपमधील अग्रगण्य संशोधन संस्था फ्रॉनहोफर-गेसेलशाफ्ट यांच्या सहकार्याने एलजीने ही चाचणी केली. एलजीला बाह्य वातावरणासाठी १०० मीटर 6G टेराहर्ट्झ वायरलेस कम्युनिकेशन सिग्नल पाठवण्यात यश आले आहे.
उत्तम कनेक्टिव्हिटी अनुभव
- एलजी कंपनीची ही वापरकर्त्यांना भरपूर सुविधा देणार आहे.
- कंपनीला अशी अपेक्षा आहे की, २०२९ मध्ये 6G कम्युनिकेशनचा व्यावसायिक वापर सुरु होईल.
- पुढील पिढीतील दूरसंचार नेटवर्क 5G पेक्षा कमी वेळेत वेगवान डेटा स्पीड आणि अधिक विश्वसनीयता देऊ शकते.
- जे वापरकर्त्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी अनुभव देईल.
एलजीचे 6G!
- २०१९ मध्ये एलजीने 6G रिसर्च सेंटरची स्थापना केली.
- तसेच गेल्या वर्षी 6G टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी कोरिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड सायन्स सोबत करार केला.
- एलजी या कोरियन कंपनीवर पाश्चात्य देशांचाही विश्वास आहे.
- त्यामुळे युरोपियन देशातील संशोधक संस्थाही एलजीसोबत चाचण्यांमध्ये सहभागी होत आहेत.
एलजीचे 6Gसाठीचे प्रयत्न
- अल्ट्रावाइड बँड स्पेक्ट्रममध्ये एक लहान फ्रिक्वेन्सी कव्हरेज रेंज आहे.
- अँटेना ट्रान्समिशन आणि रिसीव्हिंग प्रक्रियांमध्ये विजेचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.
- त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी अॅडव्हान्स्ड पॉवर एम्पलिफायर्सची गरज भासते.
- डेटा ट्रान्समिशनच्या बाबतीत एलजीने आता पुढचे संशोधन सुरु केले आहे.
- नवीन अॅम्प्लीफायर १५५-१७५ गीगीहार्ट्ज बँडमध्ये स्थिर संप्रेषणासाठी १५ डेसिबल-मिलीवॅटचा जास्तीत जास्त आउटपुट सिग्नल देऊ शकतो.
- एलजीने अॅडॅप्टिव्ह बीमफॉर्मिंग आणि हायगेन अँटेना स्विचिंग तंत्रज्ञान देखील विकसित केले आहेत, जे 6जी टेराहर्ट्झ वायरलेस कम्युनिकेशनची क्षमता देते.