Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुक देणार छोट्या व्यावसायिकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Facebook

मुक्तपीठ टीम

फेसबुक आता फक्त वाढदिवस साजरा करणं, श्रद्धांजली वाहणं आणि विचार मांडणं यासाठीचं सोशल मीडिया माध्यम राहिलेलं नाही. आता जगाशी जोडणारं हे समाजमाध्यम आता देशातील छोट्या व्यावसायिकांना मोठे बनवण्यासाठी कर्ज देण्याचंही माध्यम बनलं आहे. फेसबुकने कर्ज पुरवठ्यासाठी इंडिफी या पतपुरवठा कंपनीसोबत भागीदारी केली आहे. देशातील छोट्या व्यावसायिकांना ५० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जाचे पैसे खात्यात पाच दिवसात येतील. थोडक्यात समाजमाध्यमाच्या माध्यमातून आता आपल्याला व्यावसायिक वाढीसाठी भांडवलही मिळणार आहे.

 

ज्यामुळे आपण सहजपणे कोणत्याही संधीचा लाभ घेऊ शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. यामध्ये कर्जावरील व्याज सूट देखील मिळेल.

कर्ज क्षेत्रात फेसबुकचे पहिले पाऊल

  • सोशल मीडिया क्षेत्रावर सत्ता गाजवल्यानंतर फेसबुकला आता कर्ज क्षेत्रातही वर्चस्व गाजवायचे आहे.
  • यासाठी कंपनीने भारतासाठी प्रथमच ‘लघु व्यवसाय कर्ज उपक्रम’ योजना जाहीर केली आहे.
  • यापूर्वी फेसबुकने अशी योजना जगातील इतर कोणत्याही देशात सुरू केलेली नाही.
  • या योजनेसाठी फेसबुकने वित्तीय कंपनी इंडिफीसोबत भागीदारी केली आहे.
  • इंडिफीद्वारे हे कर्ज दिले जाईल, पण फेसबुक देखील यात आपली भूमिका बजावेल.

पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध मिळणार

  • फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेच्या माध्यमातून कंपनी लहान व्यवसायांना भांडवल पुरवते.
  • तसेच, या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी, छोट्या व्यापाऱ्यांना प्रथम त्यांच्या व्यवसायाची जाहिरात फेसबुकमध्ये करावी लागेल.
  • यानंतर, ते ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतील. या कर्जावर १७ ते २० टक्के दराने व्याज आकारले जाईल.
  • या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या लोकांकडून इंडिफाई कर्जाच्या अर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. ५ दिवसात कर्ज उपलब्ध होईल.
  • अजित मोहन यांच्या मते, इंडिफी अर्जदाराला सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत कर्ज मिळेल.
  • महिला व्यावसायिकांना व्याजदरात ०.२ टक्के सूट मिळेल.
  • सध्या ही योजना देशातील २०० शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
  • कर्जाची संपूर्ण रक्कम इंडिफी देईल आणि व्यावसायिकांनाही कर्जाची रक्कम इंडिफीलाच द्यावी लागेल.

 

पाहा व्हि़डीओ:


Tags: Facebooksmall businessesअजित मोहनपतपुरवठा कंपनीफेसबुकलघु व्यवसाय कर्ज उपक्रम
Previous Post

भारतात 5Gची प्रतिक्षा…एलजीकडून युरोपात 6G नेटवर्कची चाचणी

Next Post

छोट्या प्रवासासाठी टियाची मेड इन इंडिया मोंत्रा ई-बायसिकल्स

Next Post
tia montra-bicycles

छोट्या प्रवासासाठी टियाची मेड इन इंडिया मोंत्रा ई-बायसिकल्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!