मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप पेमेंट्स सर्व्हिसचा भारतातील कामकाज मनेष महात्मे पाहाणार आहेत. मनेष महात्मे यांची व्हॉट्सअॅप पेमेंट्सने बिझनेस इन इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. मनेष यांना सिटी बँक, एअरटेल मनी आणि अॅमेझॉनसारख्या डिजिटल वित्तीय सेवा आणि पेमेंट्स क्षेत्रातील कामकाजाचा १७ वर्षांचा अनुभव आहे.
मनेष यांना डिजिटल पेमेंट क्षेत्राचा दीर्घ अनुभव
- अॅमेझॉननंतर मनेष यांनी व्हॉट्सअॅप जॉईन केलं आहे.
- अॅमेझॉन पे इंडियामध्ये त्यांनी डायरेक्टर आणि बोर्ड मेंबर म्हणून ७ वर्षे काम केलं आहे.
- यावेळी त्यांनी उत्पादन, अभियांत्रिकी आणि ग्रोथ टीम्सचे नेतृत्व केले.
- अॅमेझॉनपूर्वी मनेष यांनी सिटी ग्रुप आणि भारती एअरटेलमध्ये काम केले आहे.
व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस म्हणाले की, भारतातील डिजिटल पेमेंट्स ग्रोथसाठी मनेष मुख्य इनोव्हेटर आहेत. त्यांनी त्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. आम्ही त्यांच्या अनुभवाचा उपयोग पेमेंट्स आणि व्हॉट्सअॅपवर विक्रीस प्रोत्साहित करण्यासाठी करू. ते पुढे म्हणाले की, मनेष यांनी व्हॉट्सअॅप जॉईन केल्यापासून ते खूप उत्साहित आहेत.