Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील नागरी, औद्योगीक क्षेत्रातील व्यवस्थापनाचा घेतला आढावा

June 29, 2021
in सरकारी बातम्या
0
cm-uddhav-thackeray

मुक्तपीठ टीम

सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत नागरी तसेच औद्योगीक क्षेत्रासाठी आतापर्यंतच्या अनुभवांच्या आधारावर पुढे जाऊन दीर्घकालीन नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील नागरी तसेच औद्योगीक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापनाबाबत आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, नागरी क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत प्राधान्यक्रम निश्चित करा. पाणी, जमीन आणि कचऱ्याच्या अनुषंगाने

 

आता काय समस्या आहेत आणि येत्या काळात काय परिस्थिती उद्भवू शकते यांचा विचार करा. सांडपाणी प्रक्रियेतून मिळणाऱ्या शुद्ध पाण्याचा कसा वापर होणार, त्यासाठीच्या जलवाहिन्यांचे जाळे, अशा गोष्टींबाबतही नागरी भागासाठी नियोजन असावे लागेल. विदेशात मोठ्या उंच इमारतीमधील पाण्याच्या पुनर्वापराबाबत निश्चित धोरण आहे. अशा धोरणांचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल.

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आगामी काळात असेच कोरोना महामारीचे संकट राहीले किंवा अन्य आपत्कालिन स्थितीत उद्योगांकडे निश्चित असे पर्याय असावेत. त्यामध्ये विविध उपाययोजनांसह औद्योगीक क्षेत्रातच मनुष्यबळाच्या निवासाची व्यवस्था करता येईल अशा टाऊनशिपचा विचार व्हावा. जेणेकरून या उद्योगांतील उत्पादन थांबणार नाही. नागरी तसेच औद्योगीक क्षेत्रातील सांडपाणी आणि कचऱ्याबाबत आता जे प्रश्न आहेत, त्याबाबत गाठीशी असलेलेल्या अनुभवांचा विचार करून पुढे जावे लागेल. त्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

 

औद्योगीक सांडपाणी आणि प्रदुषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग विभाग, एमआयडीसी आणि औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांना एकत्रितरित्या रसायन निर्मिती उद्योगांबाबत धोरण निश्चित करावे लागेल. विशेषतः आता निवासी क्षेत्रालगत असलेले धोकादायक उद्योग आणि अशाप्रकारच्या उद्योगांसाठी भविष्यातील नियोजन या अनुषंगानेही सर्वंकष धोरण निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

यावेळी बैठकीत पाठक यांनी राज्यातील नगरविकास विभागातर्फे सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापन यांच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम, स्पर्धा, प्रयोगांची माहिती दिली. तर अन्बलगन यांनी औद्योगीक सांडपाणी तसेच विविध उद्योग क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

 


Tags: chief minister uddhav thackerayएकनाथ शिंदेपरिवहन मंत्री अॅड. अनिल परबमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सला भारतात वाढवणार आपला मराठी माणूस

Next Post

“आर्थिक घडामोडीना चालना मिळेल, रोजगार निर्माण होईल”

Next Post
narendra modi

"आर्थिक घडामोडीना चालना मिळेल, रोजगार निर्माण होईल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!