मुक्तपीठ टीम
भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. २८ ऑगस्ट १९४९ रोजी संरक्षणमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली, या समितीच्या निर्णयानंतर दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वज दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी भारतीय सशस्त्र सेनेचे तिन्ही दल म्हणजेच भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदल विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्निव्हल, नाटक आणि इतर मनोरंजनक कार्यक्रम आयोजित करतात.
या दिवसाचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २८ ऑगस्ट १९४९ रोजी भारतीय सैन्यातील सैनिकांच्या कल्याणासाठी भारत सरकारने एक समिती स्थापन केली होती.
- या समितीने दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याची निवड केली.
- सैनिकांच्या कल्याणासाठी पैसे जमा करण्यासाठी समिती झेंडे वाटून देणगी गोळा करते.
- या ध्वजातील तीन रंग तिन्ही सैन्यांचे प्रतिनिधित्व करतात.
- सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलनाची तीन मुख्य उद्दिष्टे
- १) पहिल्या युद्धात झालेल्या जीवितहानीमध्ये सहकार्य.
- २) दुसरे सैन्य आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आणि सहकार्यासाठी
- ३) तिसरे निवृत्त जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी.
सशस्त्र सेना ध्वज दिनी शहीद, अपंग माजी सैनिक, युद्धात वीर मरण पावलेल्या सैनिकांच्या पत्नी आणि कुटुंबांची काळजी घेण्यासाठी मदत सुनिश्चित करतो. हा दिवस त्यांच्याबद्दलची वचनबद्धता आणि आदर यांचे प्रतीक आहे. सैनिक हे देशाची ढाल आहेत, जे सर्व संकटांपासून देशाचे रक्षण करतात. सैनिक हे देशाचा अभिमान आहेत. देशाचा अभिमान बनून देशाचे रक्षण करतात आणि सन्मान वाढवतात.