Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

RBI रेपो रेट: सहा महिन्यात किती व्याज, किती वाढले होम लोन हप्ते?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Reserve Bank of India Governor Shaktikanta Das

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आज रेपो रेटमध्ये ३५ बेसिस पॉइंट्स किंवा ०.३५ टक्के वाढ केली आहे. आता आरबीआयचा रेपो रेट ५.४% वरून ६.२५% झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने सलग पाचव्यांदा त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनंतर देशात गृहकर्ज, कर कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर सर्व कर्जांचे व्याजदर पुन्हा एकदा वाढलेले पाहायला मिळतील. आजच्या वाढीसह, गेल्या काही महिन्यांत व्याजदर २.२५ टक्क्यांनी वाढले आहेत, ज्याचा थेट परिणाम बँकांनी दिलेल्या कर्जावर दिसत आहे.

रेपो रेट वाढीची घोषणा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर श्री शक्तीकांत दास यांनी केली. त्यांनी सांगितले की, पुढील चार महिन्यांत महागाई दर ४ टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे. एमपीसीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा दिसून येत आहे. ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढला आहे. तसेच, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जीडीपी वाढ ६.८% असू शकते. तर, आर्थिक वर्ष २०२४च्या पहिल्या तिमाहीत सीपीआय ५% वर राहू शकेल. असेही ते म्हणाले.

२.२५ टक्के व्याजदरात वाढ…

  • वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेटमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली होती.
  • मे महिन्यात ०.४० टक्के, जूनमध्ये ०.५० टक्के, ऑगस्टमध्ये ०.५० टक्के, सप्टेंबरमध्ये ०.५० टक्के आणि डिसेंबरमध्ये ०.३५ टक्के वाढ झाली आहे.
  • अशा प्रकारे गेल्या वर्षभरात व्याजदरात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • यामुळे रेपो रेट ४ टक्क्यांवरून आता ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गृहकर्जावरील ईएमआयमध्येही वाढ!

जर, एप्रिल २०२२मध्ये १५ वर्षांसाठी कोणत्याही बँकेकडून ७.०० टक्के व्याजाने २० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. त्या काळातील ईएमआय १७ हजार ९७७ पर्यंत पोहोचला होता, परंतु व्याजदरात २.२५ टक्के वाढ केल्यास, त्याच कर्जासाठी ९.२५ टक्के दराने २० हजार ५८४ रुपये द्यावे लागतील.


Tags: muktpeethRBIRBI GovernorRepo RateReserve Bank of IndiaReserve Bank of India Governor Shaktikanta Dasआरबीयआरबीय गव्हर्नरघडलं-बिघडलंभारतीय रिझर्व्ह बँकमुक्तपीठरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर शक्तीकांत दासरेपो रेट
Previous Post

कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन: का साजरा केला जातो आणि त्यामागील इतिहास काय?

Next Post
Indian Armed Forces Flag Day

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन: का साजरा केला जातो आणि त्यामागील इतिहास काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!