मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट मंदावत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवत आहे. कोरोनाची तिसरी लाट मात्र तिसरी लाट कधी येणार? याबाबत जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOचे प्रमुख टेड्रॉस अदहानोम गॅब्रेयेस महत्त्वाची माहिती दिली आहे. जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्राथमिक टप्प्यात पोहचल्याचं त्यांनी म्हटलंय.
मृत्यू दरात १० आठवडे घट होत राहिल्यानंतर वाढ
- कोरोना प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
- डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणाले की, उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये लसीकरणाच्या वेगवान गतीमुळे संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये आणि मृत्यूंमध्ये घट झाली होती, परंतु आता तिथे रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.
कोरोना संसर्गात पुन्हा वाढ-
- मृत्यू दरात १० आठवडे घट होत राहिल्यानंतर आता वाढ होत आहे.
- कोरोनाचा विषाणू सतत आपले स्वरुप बदल आहे, सोबतच तो अधिक संसर्गजन्यही होतो आहे.
- ते म्हणाले की, डेल्टा प्रकार आता १११ पेक्षा जास्त देशांपर्यंत पोहोचला आहे.
- लवकरच हा जगभर पसरू शकतो.
- विषाणूचा अल्फा प्रकार १७८ देशांमध्ये, १२३ देशांमध्ये बीटा आणि ७५ देशांमध्ये गॅमा आढळला आहे.
अमेरिका, युरोपमध्ये वाढता संसर्ग-
- अमेरिकेत ६७%, स्पेनमध्ये ६१% प्रकरणे वाढली.
- ब्राझीलमध्ये जगात सर्वाधिक नवीन केस आढळत आहेत.
- गेल्या २४ तासांत त्यांची संख्या ५७ हजाराहून अधिक होती.
- गेल्या आठवड्यात येथे ३.४९ लाख प्रकरणे आढळली.
- खरेतर येथे नवीन प्रकरणांमध्ये १४% घट झाली आहे.
- या काळात इंडोनेशियात ४५%, ब्रिटनमध्ये २८%, अमेरिकेत ६७%, स्पेनमध्ये ६१% प्रकरणे वाढली आहेत.
- दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात मृत्यूच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे.
- येथे ६ हजार नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ इंडोनेशिया आणि बांगलादेशचा क्रमांक लागतो.
निर्बंधांमधील सूट दिल्याने भारतात धोका वाढला
- बहुतेक राज्यांमध्ये नियम शिथील केले जात आहेत.
- आर्थिक व्यवहार खुले केले जात आहेत आणि लसीकरणाचा वेगही मंदावला आहे.
- यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक वाढला आहे.
- यूबीएसच्या अहवालानुसार, पूर्वी भारतात दररोज सरासरी ४० लाख डोस दिले जात होते.
- आता ही संख्या ३४ लाखांवर आली आहे.
- ही परिस्थिती यामुळेही धोकादायक आहे.
- कारण आता ४५% प्रकरणे ग्रामीण भागात समोर येत आहेत.
- दरम्यान, हेद्राबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र तज्ज्ञांनी तिसरी लाट ४ जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा केला आहे.