मुक्तपीठ टीम
आजकाल प्रीमॅच्युअर बाळ जन्माला येण्याचं प्रमाण वाढलं आहे. ज्या बाळांचा जन्म वेळेआधी होतो, त्याला प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतात. प्रीमॅच्युअर जन्म खूप धोकादायक आहे, कारण बाळाला आईच्या पोटात पूर्ण विकसित होण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नाही. प्रीमॅच्युअर बाळाला श्वसनाचे विकार, कावीळ, अशक्तपणाचा त्रास होतो. यामुळे जाणून घेवूया प्रीमॅच्युअर बाळाची कशी काळजी घ्यावी, त्यासाठी काय उपाय करता येतील…
प्रीमॅच्युअर बाळाची अशी काळजी घ्या…
- प्रीमॅच्युअर बाळ म्हणजे नाजूक बाळ.
- मुलांना घरी ठेवणेही धोकादायक आहे.
- प्रीमॅच्युअर मुले वेळेपूर्वी जन्माला येतात आणि त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.
- डॉक्टरांच्या सल्ल्याविना बाळाला घरी नेऊ नका.
- स्तनपान हा मातृत्वाचा महत्त्वाचा भाग आहे.
- स्तनपानाचे अनेक फायदे आहेत.
- आईच्या दुधात काही पोषक आणि जीवनसत्त्वे असतात जे प्रीमॅच्युअर बाळाला वेगाने आणि निरोगी वाढण्यास मदत करतात.
- फॉर्म्युला दुधापेक्षा आईचे दूध पचायला सोपे असते.
- आईचे दूध तिच्या शरीराने खास बाळासाठी बनवलेले असते.
बाळाशी त्वचेपासून त्वचेचा संपर्क कायम ठेवा…
- बाळाला लंगोट घालून तुमच्यी छातीवर शर्टाखाली किंवा ब्लँकेटमध्ये ठेवून त्वचेपासून त्वचेच्या संपर्क ठेवावा.
- त्वचेच्या संपर्काचे अनेक फायदे आहेत.
- बाळाला असलेल्या कोणत्याही वेदना किंवा तणाव कमी करण्यासाठी हा उपाय चांगला आहे.
बाळाच्या झोपेकडे जास्त लक्ष द्या…
- बाळ दिवसभर झोपणे सामान्य आहे.
- झोपेमुळे त्याची वाढ आणि विकास प्रक्रियेत मदत होते.
- बाळ नीट झोपत आहे याची खात्री करा.
- बाळ नेहमी त्याच्या पाठीवर झोपलेले असावे.
- डोक्याखाली उशी नसावी तर नेहमी सपाट कपडा डोक्याखाली ठेवावा.
बाहेर जाणे टाळा…
- बाळाच्या प्रीमॅच्युअर जन्मानंतर, जास्त वेळ घरी थांबा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
- प्रीमॅच्युअर बाळाची प्रतिकारशक्ती खूप कमकुवत असते.
- त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.
- त्यांचा पलंग स्वच्छ ठेवा.
- बाळाला स्पर्श करण्यापूर्वी हात चांगले धुवा.
- घरातील वातावरण शुद्ध ठेवा.
- मोठा आवाज होणार नाही याची काळजी घ्या.