Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणः आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पलकला जामीन मंजूर!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Bhayyu Maharaj Suicide Case

मुक्तपीठ टीम

इंदूरमधील भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपी पलक पुराणिकला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पलक चार वर्षे तुरुंगात होती. पलकवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या आरोपावरून जानेवारी २०२२मध्ये सत्र न्यायालयाने तिच्यासह दोन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तेथून त्यांना दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी आरोपी पलकने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ते मान्य केले आहे.

भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी स्वत:च्या लायसन्स रिव्हॉल्व्हरने कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सुमारे सहा महिन्यांनी पोलिसांनी महाराजांचे तीन सेवक आरोपींना अटक केली होती.

आरोपी सेविकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत युक्तिवाद सादर केला…

  • याचिकेत आरोपी सेविका पलकच्या वतीने तिला सहा वर्षांची शिक्षा झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
  • ती चार वर्षांपासून तुरुंगात असून तिची याचिका अजूनही प्रलंबित आहे.
  • अशा स्थितीत तिला जामिनाचा लाभ देण्यात यावा. ती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने पलकला जामीन मंजूर केला.

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपींवरील आरोप

  • पलकवर भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे.
  • या कामात पलकसोबत महाराजांचे सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख हेही होते.
  • महाराजांना पैशासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आरोपींवर होता. याला कंटाळून भय्यू महाराज यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
  • याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पलक आणि महाराज यांच्यातील चॅटिंगचा मोबाईलही जप्त केला होता.
  • षड्यंत्र रचताना त्यांनी महाराजांकडून भरपूर पैसाही गोळा केला होता. त्यांच्या छळाला कंटाळून महाराजांनी आत्महत्या केली होती.
  • सत्र न्यायालयाच्या आदेशाला पलकने मध्यप्रदेश उच्च न्यायालयात आव्हान दिले.
  • जामीनही मागितला होता, पण दिलासा मिळाला नाही.

Tags: Accused Palak PuranikBhayyu Maharaj Suicide CaseIndoremuktpeethSupreme Courtआरोपी पलक पुराणिकइंदूरकायदा पोलीसघडलं-बिघडलंभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणमुक्तपीठसर्वोच्च न्यायालय
Previous Post

मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यालय उभारणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

प्रीमॅच्युअर बाळाची अशी घ्या काळजी, बाळ राहिल तंदुरुस्त!!!

Next Post
Premature Baby

प्रीमॅच्युअर बाळाची अशी घ्या काळजी, बाळ राहिल तंदुरुस्त!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!