Tag: UIDAI

बिनधास्त करा ‘आधार’चा वापर…पण घ्या ‘अशी’ खबरदारी!

मुक्तपीठ टीम अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा. आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकतात. आपण जरी कोणत्याही विश्वासार्ह संस्थेला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज देणार असू तर अशावेळी देखील तशाच पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी जशी आपण, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र तसेच पॅन कार्डसारखे दस्तऐवज देताना बाळगतो. जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल. यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात. नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये / गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी सर्वांसाठी खुल्या असलेल्या कोणत्याही व्यासपीठावर विशेषतः समाजमाध्यमे आणि सर्वांसाठी खुल्या माध्यमांवर आपले आधार कार्ड कुणाशीही सामायिक करू नये असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे. जर आपल्याला आधारचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी ...

Read more

तुमच्या आधार कार्डला दहा वर्ष झालीत? आपली कागदपत्रे अपडेट करा! कसं ते जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्डे मिळाली आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षात कधीही ही आधार कार्डे अद्ययावत ...

Read more

“आधार कार्ड घेताना त्याची पडताळणी करा”, यूआयडीएआयचा राज्य सरकारला सल्ला!

मुक्तपीठ टीम आधार कार्ड ही भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी ओळख आहे. आधार आज प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ...

Read more

लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींनी आधार नोंदणी करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम सामाजिक न्याय विभागासह इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत ...

Read more

आधार कार्ड खरे की बनावट, हे ऑनलाइन कसे ओळखावे? जाणून घ्या सोपा मार्ग

मुक्तपीठ टीम डिजीटलायझेशनच्या जगात आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आधार कार्डमुळे आपण भारताचे नागरिक आहोत ही ओळख पटते. ...

Read more

आधार युजर्सना आता एका क्लिकमध्ये आधार केंद्र शोधता येणार, UIDAI चा इस्रोशी करार!!

मुक्तपीठ टीम प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे लक्षात घेऊन आधारकार्ड जारी करणारी संस्था युनिक ...

Read more

वारांगनांना पत्त्याच्या पुराव्याविना आधारकार्ड, सर्वोच्च न्यायालयात यूआयडीएआयची माहिती

मुक्तपीठ टीम सध्याच्या काळात कधीही, कुठेही लागणारे आणि महत्त्वाचे मानले जाणारे दस्तऐवज म्हणजे आधारकार्ड. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआयने ...

Read more

UIDAIचं अस्सल ‘आधार’ पीव्हीसी कार्ड फक्त ५० रुपयांमध्ये! असं मिळवा…

मुक्तपीठ टीम आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वापरास सोपे ...

Read more

आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा! कसं करायचं ते जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम आधार कार्ड भारतीयांचे सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे. आधार ओळखपत्र हे सर्व सरकारी आणि गैर सरकारी कामांसाठी अनिवार्य आहे. ...

Read more

‘आधार’साठी आता मोबाइल फोनच बनणार ऑथेंटिकेटर, UIDAIची नवी संकल्पना!

मुक्तपीठ टीम आधार नियामक युनिक आयडेंटिटी ऑथेरिटी ऑफ इंडिया (UIDAI)सध्या एका मोठ्या संकल्पनेवर काम करत आहे. जर ती संकल्पना प्रत्यक्षात ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

error: Content is protected !!