Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुमच्या आधार कार्डला दहा वर्ष झालीत? आपली कागदपत्रे अपडेट करा! कसं ते जाणून घ्या…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Aadhaar card

मुक्तपीठ टीम

ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्डे मिळाली आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षात कधीही ही आधार कार्डे अद्ययावत केली नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावीत, असे  आवाहन युआयडीएआयने  केले  आहे.

सर्व रहिवासी आपली ओळख पटवणारी  पूरक कागदपत्रे (ओळखपत्र पुरावा आणि निवासाचा पुरावा) एकतर, माय आधार पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात अद्ययावत करू शकतात  किंवा आपल्या जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात जाऊनही  अद्ययावत करू शकतात.

गेल्या दशकभरात, भारतातील नागरिकांचे आधार कार्ड, हे सर्वत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारार्ह झाले आहे. ११०० पेक्षा अधिक सरकारी योजना आणि कार्यक्रम, ज्यात, ३१९ केंद्र सरकारचे कार्यक्रम/योजनाही समाविष्ट आहेत, त्यात लाभ किंवा सेवा संबंधित व्यक्तीपर्यन्त पोहोचवण्यासाठीचा पुरावा म्हणून, आधार कार्ड ग्राह्य धरले जाते.

त्याशिवाय, अनेक बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था देखील ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी, आधारचा ओळखपत्र म्हणून वापर करतात. त्यामुळे, आपला सध्याचा रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र पुरावा देऊन, आधार कार्ड अद्ययावत करुन घेणे केव्हाही नागरिकांच्या हिताचे ठरू शकते.

आधारमधील कागदपत्रे अद्ययावत ठेवल्याने  आपले जीवनमान सुलभ होण्यास, उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत होते आणि अचूक प्रमाणीकरण देखील शक्य होते. युआयडीएआयने कायम रहिवाशांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी आधार (नोंदणी आणि अद्यतन) (दहावी सुधारणा) अधिनियम २०२२ची अधिसूचना हे त्याच दिशेने आणखी एक पाऊल होते.

भारतीय एकल ओळखपत्र प्राधिकरण- युआयडीएआय पुन्हा एकदा रहिवाशांना आधार डेटाबेसमधील माहितीच्या अचूकतेसाठी त्यांची कागदपत्रे अद्यायवत करण्याचे आवाहन करते आणि त्यासाठी प्रोत्साहित करते.


Tags: Aadhaar cardAadhaar Card DocumentsAadhaar Card UpdateDocuments Updategood newsmuktpeethUIDAIuseful newsआधार कार्डआधार कार्ड अपडेटआधार कार्ड कागदपत्रेउपयोगी बातमीकागदपत्रे अपडेटचांगली बातमीमुक्तपीठयुआयडीएआय
Previous Post

‘रक्तदान करा-जीव वाचवा’: मानवी जीवन वाचवण्यासाठी दक्षिण कमांडच्या सैनिकांकडून रक्तदान मोहीम

Next Post

भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि कर्मचारी पदावर १ हजार ४३८ जागांसाठी भरती

Next Post
sbi

भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि कर्मचारी पदावर १ हजार ४३८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!