Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधार कार्ड खरे की बनावट, हे ऑनलाइन कसे ओळखावे? जाणून घ्या सोपा मार्ग

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Aadhaar card

मुक्तपीठ टीम

डिजीटलायझेशनच्या जगात आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आधार कार्डमुळे आपण भारताचे नागरिक आहोत ही ओळख पटते. अशा परिस्थितीत तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. यासोबतच तुमचा आधार अॅक्टिव्ह आहे की, नाही हे देखील तपासावे. त्यासाठी वेळोवेळी पडताळणी करावी. आधार कार्ड ऑनलाइन पडताळण्याची पद्धत खूप सोपी आहे.

आजच्या काळात सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सिमकार्ड अनिवार्य आहे. यामुळेच सायबर गुन्हेगारी प्रकरणे वाढली आहेत. डुप्लिकेट आधार कार्ड बनवण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआयने बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत ६ लाख बनावट आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत.

डुप्लिकेट आधार कार्डच्या प्रकरणांमध्ये यूआयडीएआय करणार कारवाई

  • डुप्लिकेट आधार कार्डच्या प्रकरणांमध्ये खूप वाढ झाली आहे.
  • आधार कार्डचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया सतत कार्यरत आहे.
  • यूआयडीएआय चुकीच्या पद्धतीने तयार केलेले आधार कार्डवर देखील कारवाई करणार आहे.
  • यूआयडीएआयने देशातील ६ लाख डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केले आहेत. चुकीच्या पद्धतीने डुप्लिकेट आधार बनवल्याबद्दल प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे.

फेशियल रेकग्निशन फिचरचा वापर

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत एक माहिती दिली आहे.
  • चंद्रशेखर म्हणाले की, यूआयडीएआय डुप्लिकेट आधार पडताळणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करत आहे आणि आता व्हेरिफिकेशन फिचर म्हणून फेशियल रेकग्निशन जोडले गेले आहे.
  • डुप्लिकेट आधार व्यतिरिक्त पेन्शनच्या पडताळणीसाठी फेशियल रेकग्निशन देखील लागू करण्यात आले आहे.
  • आतापर्यंत, १ लाख निवृत्ती वेतनधारकांना या तंत्रज्ञानाद्वारे प्रमाणित केले गेले आहे.

आधार व्हेरिफिकेशन कसे करायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला यूआयएडीआय वेबसाइट www.uidai.gov.in वर जावे लागेल
  • वेबसाइटवर आधार सेवांमध्ये आधार क्रमांक प्रविष्ट करा वर क्लिक करा.
  • आता समोर एक नवीन पेज उघडेल. येथे, १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
  • आधार क्रमांक खरा असल्यास, वेबसाइटवर आधार पडताळणी पूर्ण झाल्याचा संदेश येईल. यासह, तुमचे इतर तपशील देखील दाखवले जातील.
  • वारंवार प्रयत्न करूनही तुम्ही आधार क्रमांकाची पडताळणी करू शकत नसल्यास, वेबसाइट तुम्हाला सांगेल की तुमचा आधार क्रमांक अस्तित्वात नाही.

Tags: Duplicate Aadhar Card CaseFake Aadhar Cardgood newsmuktpeethOnline Aadhar CardUIDAIuseful newsउपयोगी बातमीऑनलाइन आधार कार्डचांगली बातमीडुप्लिकेट आधार कार्ड प्रकरणबनावट आधार कार्डमुक्तपीठयूआयडीएआय
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना…

Next Post

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात १७३ जागांवर करिअर संधी

Next Post
Smart Maharashtra

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात १७३ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!