मुक्तपीठ टीम
कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांप्रमाणेच शिक्षकांनीही अमूल्य काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन एस. आर. दळवी फाऊंडेशकडून या कोरोनायोद्धे शिक्षकांचा समसंग टॅब व महाशिक्षक पुरस्काराने सन्मान केला. या फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र दळवी व सीमा दळवी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. नरीमन पाईंट येथील यशवंतराव चव्हाण सेटंरमध्ये शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, ग्लोबल टिचर्स पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिपचे संचालक डॉ. राधाकृष्ण पिल्लई, मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, स्वेअर पांडाचे आशिष झालाणी, मनशक्तीचे मयुर चंदने यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात बोलताना शिक्षमंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाकाळात आपल्या सर्वांसमोर एक आव्हात्मक परिस्थिती उभी ठाकली होती पण त्या परिस्थीतीकडे आपण एक संधी म्हणून पाहिले आणि रज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणात खंड पडू न देता शिक्षण सुरुच ठेवले त्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबला त्यासठी अनेक मार्ग स्विकारावे लागले. परंपरागत शिक्षणाचा जागी तंत्रज्ञानाने घेतली पण शिक्षणाची गंगा सुरुच ठेवली.
परिस्थिती कठीण होती पण प्रयत्न केल्यास मार्ग सापडत जातात. शिक्षण क्षेत्रात बदलत्या काळाप्रमाणे बदल होत आहेत. आपली स्पर्धा वाढली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांच्या फक्त इमारती व पायाभुत सुविधा देऊन चालणार नाही तर त्यातील शिक्षकाने सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे लागणार आहे. शालेय शिक्षण विभाग हा क्रांती करणारा विभाग आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे आणि प्रगतच राहिल यासाठी पण बदल स्विकारावेत, नवीन कल्पना,संकल्पाना शिक्षण क्षेत्रात आणल्या पाहिजेत. जे शिक्षण नवीन प्रयोग करतील त्याची नक्कीच दखल घेतली जाईल.
कोरोनाकाळात डॉक्टरांनी लोकांचे जीव वाचवले पण शिक्षकांनी भविष्य वाचवले म्हणूनच त्याची पावती म्हणून तुमचा सन्मान होत आहे. शिक्षकांचा सन्मान करताना टॅब देऊन या संस्थेने वेगळा व चांदला पायंडा पाडला आहे. या टॅबचा वापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी करावा, डिजिटलचा वापर वाढवा. आपण सर्व शिक्षण हे ग्लोबल टिचर्सच आहेत. परिस्थितीशी झुंजता व त्यावर मात करता आली पाहिजे. स्वतःला झोकून देऊन काम करा त्याची दखल नक्कीच घेतली जाते. अपयशाकडे एक संधी म्हणून पहा. मुलांना समजेल अशा भाषेत शिकवले पाहिजे. शिक्षकांवर विश्वास निर्माण झाला पाहिजे. तंत्रज्ञान हा आता शिक्षणात महत्वाचा भाग झाला आहे म्हणून शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरावी अन्यथा भविष्य कठीण होईल. कोरोनानंतर शिक्षणाची पद्धत बदलली.. पूर्वी आचार्य गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला गुरुकुलात जावे लागत असे नंतर शाळा आला तिथे शिक्षक व विद्यार्थी येऊ लागले पण आता कोविडनंतर जिथे विद्यार्थी आहे तिथे शिक्षण पोहचले पाहिजे अशी परिस्थिती झाली आहे. मुलांना कधीही, कुठेही शिक्षणाची संधी मिळाली आहे. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी बदलाची भूमिका ठेवली पाहिजे, असे मत ग्लोबल टिचर्स पुरस्कार प्राप्त शिक्षण रणजितसिंह डिसले यांनी मांडले.
कोराना काळात शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी या भावनेतून एस. आर. दळवी फाऊंडेशनने शिक्षकांच्या कार्याला योग्य न्याय देण्यासाठी हा पुरस्कार देण्याचा विचार केला. यासाठी १५८ नामांकने आली होती त्यातून ज्युरींनी ७ शिक्षकांना महाशिक्षक पुरस्कार व सॅमसंग टॅब देऊन सन्मान करणे व आणखी ५ शिक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती एस. आर. दळवी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र दळवी यांनी दिली.
सीमेवर जवान लढत असतात तर देशात आपण शिक्षक म्हणून देशाचे भविष्य घडवत असतो. आपण शिक्षक म्हणून सक्षम आहोत. आपल्यात आणखी काय करता येईल यासाठीच Teachers Talks app हे व्यासपीठ शिक्षकांसाठी निर्माण केले आहे. या डिजीटल माध्यमातून शिक्षकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणता आले आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरचे शिक्षकही या ऍपवर येऊन विचारांची देवाण घेवाण करत असतात ही आनंदाची बाब आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी यात सहभागी व्हावे आणि शिक्षकांनी त्यांचा कल्पना, संकल्पना व सुचना या ऍपवर मांडाव्यात असे आवाहन एस आर फाऊंडेशनच्या सीमा दळवी यांनी केले.
राधाकृष्ण पिल्लई, मनशक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे, डिजीटल तज्ञ नयन भेडा यांनी शिक्षक, शिक्षणपद्धती व बदलते रुप यावर आपली मते व्यक्त केली. विवेकानंद मधुकर डेसले, वरुणाक्षी भारत आंबरे, बापू सुखदेव बावीसकर, मनोज बापू सुतार, लिंबराव गणपतराव बोंडगे, भगवान मनोहर बुऱ्हांडे, दर्शन पोचिराम भंडारे यांना ७ शिक्षकांना महाशिक्षक पुरस्कार, सॅमसंग टॅब व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर महेश लाडू सावंत, ज्ञानेश्वर कौतिक माळी, इलियास अब्दुल लतिफ शेख, इम्तियाज इमामुद्दीन सिद्दीकी व सुरेश भगवान यादव या पाच शिक्षकांचा विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
एस. आर. फाऊंडेशनचा पाया रचणाऱ्या शिल्पा गौड, आरती मिश्रा, आरती दर्याणी समीना शेख, अभिषेक पटेल आणि प्रेम राजपाल यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.