Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

योग्य मोबदल्यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर देण्याची आवश्यकता

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवारांचे प्रतिपादन

November 15, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Galit hangam subharambh

मुक्तपीठ टीम

शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करत ऊसाला अधिक उतारा कसा मिळेल यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा तसेच कारखानदारी यशस्वी होण्यासाठी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन उत्पादन करावे असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरदचंद्र पवार यांनी केले. रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि. काकासाहेब नगर रानवड या कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम शुभारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

chhagan bhujbal

 

यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, किशोर दराडे, सरोज आहिरे, हेमंत टकले, नानासाहेब बोरस्ते, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर महासंघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, नीलिमाताई पवार, अजिंक्य वाघ, शरद आहेर, नानासाहेब महाले, सुरेश बाबा पाटील, डॉ तुषार शेवाळे, पंढरीनाथ थोरे, माणिकराव बोरस्ते, हंसराज वडघुले, सुवर्णा जगताप, ज्ञानेश्वर जगताप, प्रकाश दायमा, शिवाजी ढेपले, राजेंद्र डोखळे, दत्तात्रेय डुकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

संकटात सापडलेला कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना चालवण्याचे शिवधनुष्य आमदार दिलीपराव बनकर यांनी हाती घेतलं. त्यांचे मनापासून कौतुक करतो.
ज्यांनी सहकार क्षेत्राची पायाभरणी केली अशा दिग्गजांमध्ये स्वर्गीय कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे नाव घ्यावे लागेल. pic.twitter.com/Easnyu9y6C

— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 14, 2021

 

यावेळी शरद पवार म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात राज्याच्या कारखानदारीचे नेतृत्व पूर्वी होत होते. कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी राज्यातील कारखानादारांचे नेतृत्व केले. कुठलीही गोष्ट ठरविली ती योग्य असेल तर त्यात तडजोड करायची नाही असे काकासाहेब वाघ यांचे नेतृत्व होते. त्यांनी सुरू केलेला कारखाना हा बंद झाला आणि आता हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्याची हिंमत आमदार दिलीप बनकर यांनी दाखविली ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Sharad pawar

ते म्हणाले की, सहकारी कारखान्यांचा जन्म हा मुळात महाराष्ट्रात झाला. या कारखान्यांनी राज्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले. पूर्वी साखर एक साखर एवढेच साखर कारखान्याचे चक्र होते आता ती परिस्थिती बदलली आहे. केवळ साखर नव्हे तर इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन निर्मिती करण्याची गरज आहे. कारखान्यात जर या चार प्रकारची निर्मिती करण्यात आली तर नक्कीच साखर कारखाने यशस्वी होऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. राज्यातील काही कारखान्यांनी हा प्रयोग केला आहे. तो आपणही करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच यासाठी आवश्यक ती मदत आम्ही करी असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

ते म्हणाले की, कमीत कमी पाण्यात ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. ऊस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादन करण्यापेक्षा राजकारणात अधिक लक्ष घालतात. यामुळे शेतकरी अडचणीत येत असून शेतकऱ्यांनी आपले पीक चांगले कसे येईल यासाठी प्रयत्न करावे त्यातून चांगला मोबदला शेतकऱ्यांना मिळेल असे सांगत शेतकऱ्यांची साथ असेल तर रानवड कारखान्याला यश नक्कीच मिळेल यात कुठलीही शंका नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशातील कारखाने आणि धरणे ही देशातील रत्न आहे असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. त्यातील एक एक रत्न विकण्याचे काम सद्याच्या सरकारकडून विकण्यात येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. पद्मश्री काकासाहेब वाघ यांनी सुरू केलेला कारखाना आमदार दिलीप बनकर यांनी पुन्हा एकदा सुरू केले ही अतिशय आनंदाची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तसेच निफाड कारखाना सुरू करण्यास आपले प्रयत्न आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी कारखाना यशस्वीपणे सुरू राहील यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की, येणाऱ्या कालावधीत साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, नागरिक, कामगार यांची यशस्वी घोडदौड सुरू राहील. महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी हिताची जपवणूक करणारे असून शेतकरी कर्जमाफी तसेच अवकाळी बाबत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहे. शेतकरी हिताचे हे सरकार येणाऱ्या काळात या कारखान्याचा विकासासाठी आपले योगदान देईल. कृषी विभागाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

dada sahebh bhuse

यावेळी दिलीप बनकर म्हणाले की, कर्मवीरांच्या योगदानातून निफाड तालुक्यात दोन कारखाने सुरू केले आहे. मंध्यातरीच्या काळात कारखाना बंद झाला होता. येथील नागरिकांच्या मागणी नंतर स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंतच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यात आला आहे. सदर कारखान्यात सोयी सुविधा करून तो यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी साखर महासंघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


Tags: Dada BhuseDilip BankarMinister Chhagan Bhujbalsharad pawarदादा भुसेदिलीप बनकरशरद पवारशेतकरीश्रीराम शेटे
Previous Post

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरणे काळाची गरज: रणजितसिंह डिसले

Next Post

रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, महिन्यात दुसऱ्यांदा धक्क्यांमुळे घबराट

Next Post
earthquake in ratnagiri and dubai

रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, महिन्यात दुसऱ्यांदा धक्क्यांमुळे घबराट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!