मुक्तपीठ टीम
देशात सातत्याने वाढ होत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई गगनाला भिडलेली असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे. दरम्यान मार्च महिन्यात झालेली किरकोळ महागाईतली वाढ प्रचंड असल्याचे आकडेवरून समोर आलीआहे. ग्रामीण भागात किरकोळ महागाई ७.६६ टक्क्यांवर पोहोचली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती ७.६८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला महागाई दर ५.८५ टक्के होता. मार्च २०२१ मध्ये किरकोळ महागाई ५.५२ टक्के आणि अन्नधान्य महागाई ४.८७ टक्के होती.
वाढत्या किमतीचा परिणाम ८७ टक्के कुटुंबांवर…
- जानेवारी-मार्च तिमाहीत किरकोळ महागाई दर सरासरी ६.३४ टक्के होता.
- एनएसओने सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
- त्यामुळे तेलाची महागाई १८.७९ टक्क्यांवर पोहोचली आहे.
- फेब्रुवारीच्या तुलनेत भाज्यांच्या किमती ११.६४ टक्क्यांनी वाढल्या, तर चिकन आणि मच्छीच्या किमती ९.६३ टक्क्यांनी वाढल्या.
- आरबीआयने २०२२-२३ साठी किरकोळ महागाई ४.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर गेली आहे.
- महागाई कमी झाली नाही, तर जूनपासून व्याजदरात वाढ होऊ शकते.
- मार्च महिन्यात भाज्यांच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने देशातील १० पैकी ९ कुटुंबांच्या अडचणी वाढल्या असल्याचे म्हटले जात आहे.
- वाढत्या किमतीचा परिणाम ८७ टक्के कुटुंबांवर झाला आहे.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…
- गेल्या काही महिन्यांपासून अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या झपाट्याने वाढीसह इंधन दरवाढीमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
- लोकांच्या घराचे बजेट आता कोलमडले आहे.
- भाज्यांसह इतर खाद्यपदार्थांचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत.
- त्यानंतर गेल्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे १० रुपयांनी वाढ झाल्याने गॅसच्या दरातही वाढ झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
- पूर्वी तो १५० ला मिळणारे पेट्रोल २५० रुपयांपर्यंत मिळत आहेत, दररोज १०० रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च १५-२० टक्क्यांनी वाढला आहे. एका महिन्यात सीएनजीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाल्याने रिक्षा आणि इतर वाहनांवर वाईट परिणाम झाला आहे.