मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने आता मोठ्या रकमांच्या ऑनलाइन पेमेंटसाठी मान्यता दिली आहे. त्यासाठी नॉन-बँक पेमेंट सिस्टम ऑपरेटरसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटी आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस या सुविधांची व्याप्ती वाढविली आहे. आतापर्यंत फक्त बँकांमध्ये ही सुविधा होती. याशिवाय रिझर्व्ह बँकेनेही डिजिटल पेमेंट मर्यादा एक लाखावरून दोन लाखांवर वाढवली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या नव्या घोषणेनुसार आता प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जारी करणारे, कार्ड नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर आणि ट्रेड रिसीव्हेबल डिस्काउंट सिस्टम प्लॅटफॉर्म आरटीजीएस आणि एनईएफटी वापर करू शकतील. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणाले की, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संचलित केंद्रीय पेमेंट सिस्टम आरटीजीएस आणि एनईएफटीचे सदस्यत्व केवळ बँकेपुरते मर्यादित होते. ज्याची व्याप्ती आता वाढवली जात आहे ‘पेटीएम, फोन पे, गुगल पेमेंट यासारख्या ऑनलाईन वापरकर्त्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल.
डिजिटल पेमेंटसना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ट्रान्सफर लिमीट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता फोन पे, पेटीएम सारख्या ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे ग्राहक दोन लाख रुपयांपर्यंतचे ट्रान्सफर करू शकतील. पूर्वी ही मर्यादा फक्त एक लाख रुपयांपर्यंत होती. आरटीजीएस ही फंड ट्रान्सफरची वेगवान प्रक्रिया आहे. या प्रणालीद्वारे आपण एका बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. आरटीजीएस आणि एनईएफटीमधील फरक पाहिल्यास, दोघांचे काम इलेक्ट्रॉनिक फंड बँक खात्यात ट्रान्सफर करणे आहे. एनईएफटीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास मर्यादा नसतानाही आरटीजीएसमध्ये तुम्हाला किमान दोन लाख रुपये ट्रान्सफर करावे लागतील. एनईएफटीमध्ये, फंड दुसर्या खात्यात पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो, परंतु आरटीजीएसमध्ये त्वरित पोहोचतो. ही सेवा २४ तास, सुरू असते.
पाहा व्हिडीओ: