Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वन्यजीवांच्या भ्रमणमार्गासाठी राज्यात ५०वे अभयारण्य

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Kanhargaon

मुक्तपीठ टीम

 

चंद्रपूर जिल्हयातील कन्हारगांव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगांव हे राज्यातील ५० वे अभयारण्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कन्हारगांव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने हा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने म्हटले आहे. विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते. वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले. याच भूमिकेतून कोल्हापूर ते कर्नाटक पर्यंतचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात ८ तर विदर्भात २ अशा १० संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणाही शासनाने याच बैठकीत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

वाघाचे भ्रमणमार्ग होणार सुरक्षित

२६९ चौरस किलोमीटर क्षेत्रात कन्हारगांव अभयारण्य असणार आहे. कन्हारगांव अभयारण्य हे चंद्रपूर जिल्हयातील प्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व्याघ्र भ्रमणमार्गाच्या महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सिमेला जोडणारा तसेच या राज्याच्या वनक्षेत्रास सलग असलेले वनक्षेत्र आहे. कन्हारगांव अभयारण्याच्या पश्चिमेकडे यवतमाळ जिल्हयातील टिपेश्वर अभयारण्य असा भ्रमणमार्ग आहे तर तेलंगणा राज्यातील कावल अभयारण्य असा भ्रमणमार्गसुध्दा आहे. कन्हारगांवच्या दक्षिणेकडील छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प असा सुध्दा महत्त्वपूर्ण भ्रमणमार्ग आहे.

 

इतिहास

चंद्रपूर जिल्हयातील वनक्षेत्र तसेच वन्यजीव संपदेने ब्रिटीशांनासुध्दा भुरळ पाडली होती हा इतिहास आहे. येथ वाघ व इतर वन्यजीव मोठया प्रमाणात असल्याने वन्यजीवांच्या शिकारी साठी ब्रिटीशांनी खास शूटिंग ब्लॉक घोषीत केलेले होते. पूर्वी इंग्रज अधिकारी शिकारीसाठी यायचे, नंतरही बरेच राजे महाराजे शिकारीसाठी यायचे. या वनक्षेत्रातील कन्हारगांव, वामनपल्ली व देवई ही ब्रिटीशांचे ‘शुटींग ब्लाॅक’ आता राज्य शासनाच्या निसर्ग संवर्धनाच्या धोरणामुळे ‘अभयारण्य’ म्हणुन ओळखले जातील.

 

आश्रयस्थळे सुरक्षित होतील

चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने आश्रयस्थळे सुरक्षित ठेवणे गरजेचे होते आणि त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय ठरेल.

कन्हारगांव अभयारण्य घोषित झाल्याने २०१३ पासून पर्यावरण प्रेमींनी रेटलेली मागणी पूर्ण झाली आहे.अभयारण्याच्या घोषणेनंतर या भागाचा विकास अधिक वेगाने होईल तसेच वन व वन्यजीवांना राजाश्रय मिळेल असा आशावाद स्थानिक वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: chandrapurKanhargaonsanctuaryकन्हारगांव अभयारण्यचंद्रपूर
Previous Post

वर्ध्याच्या आशावर्कर, टाइम मॅगझिनमध्ये झळकल्या

Next Post

आता बँकेत न जातानाही करा मोठ्या रकमांचे पेमेंट

Next Post
online transaction

आता बँकेत न जातानाही करा मोठ्या रकमांचे पेमेंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!