Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

November 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Florence Nightingale Award

मुक्तपीठ टीम

आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. यातील मनिषा जाधव, राजश्री पाटील, अल्का कोरेकर या तीन परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वर्ष २०२१ चे राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ५० परिचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.

सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात १६ वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांची प्रभावीरित्या अंमलबजावणी केलेली आहे. जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा २२ वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांनाही फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सध्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. १९८९मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुनर्वसन झालेल्या रूग्णांची सेवा कोरेकर यांनी केली आहे. सन २०१८मध्ये त्यांना युनिसेफतर्फे लसीकरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्याबाबत अ दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोरोना काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने विविध ४ पुरस्कार तर जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीनेही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहीर झाला होता. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

महाराष्ट्राची सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील ३० वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोरोनाच्या काळात एम्समध्ये सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात धोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष २०२१ असून एकूण ५० परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार १९७३पासून देण्यात येत आहे.

 


Tags: Florence Nightingale Awardgood newsmuktpeethNurses in MaharashtraPresident Draupadi MurmuSolapur DistrictUnion Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawarकेंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारघडलं-बिघडलंचांगली बातमीफ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारमहाराष्ट्रातील परिचारिकामुक्तपीठराष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसोलापूर जिल्हा
Previous Post

लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!

Next Post

भारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकेत आयटी प्रोफेशनल्ससाठी ४१ जागांवर करिअर संधी

Next Post
Indian Post Payments Bank

भारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकेत आयटी प्रोफेशनल्ससाठी ४१ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!