Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
Jaywant Wadkar also in Vijay Patkar's Varhaadi Vajantri

मुक्तपीठ टीम

प्रख्यात विनोदी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एका राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावरच डल्ला मारला आहे. आणि हो… त्यांना यासाठी अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री साक्षी परांजपे आणि शितल कलाहापुरे यांनी साथ दिली आहे… चमकलात ना हे वाचून? …बरोबर आहे तुमचं! सेलिब्रेटी असलेल्या ह्या बिनीच्या कलावंतांकडून असं घडेलच कसं? … पण तसं घडलंय! आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या चित्रपटाच्या निमित्तानं!

Jaywant Wadkar also in Vijay Patkar's Varhaadi Vajantri

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु. ल. देशपांडेंचा उल्लेख येताच अमराठी लोकांनाही ‘व्यक्ती आणि वल्ली’ची अनाहुतपणे आठवण होते. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या आगामी मराठी चित्रपटामध्येही अशीच वल्ली कॅरेक्टर्स प्रेक्षकांचं अफलातून मनोरंजन करण्यासाठी एकवटली आहेत. मराठी रंगभूमीपासून मराठी-हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत वाडकर ‘वऱ्हाडी वाजंत्री’मध्ये पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘वऱ्हाडी वाजंत्री’ ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वराज फिल्म प्रॉडक्शन या बॅनरखाली निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एका पेक्षा एक वल्ली कॅरेक्टर पहायला मिळणार असल्याचं जयवंत यांनी सांगितलं.

Jaywant Wadkar also in Vijay Patkar's Varhaadi Vajantri

‘वऱ्हाडी वाजंत्री’ हा चित्रपट म्हणजे फुल टू धमाल असून याबाबत जयवंत वाडकर म्हणाले की, वैभव परबनं अतिशय सुरेख लेखन केल्यामुळं आणि विजय पाटकरने अनोख्या शैलीत दिग्दर्शन केल्यानं ‘वऱ्हाडी वाजंत्री’मध्ये काम करताना खूप धमाल आली. दैनंदिन जीवनातील घटनाक्रमांच्या आधारे या चित्रपटात निखळ विनोदनिर्मिती केली आहे. कोणत्याही लग्नात वेगवेगळ्या स्वभावाची, भिन्न विचारांची आणि निरनिराळे हेतू असलेली मंडळी एकत्र येतात आणि लग्नसोहळा साजरा करतात. या सोहळ्यात मी रावसाहेब नावाच्या नातेवाईकाची भूमिका साकारली आहे. याचा लग्नात मिळणाऱ्या आहेरावर डोळा आहे. आहेराच्या पैशावर हात साफ करण्यासाठी हा लग्नाला आला आहे. हे कॅरेक्टर ग्रे शेडेड नाही. काहींना पैसे बघितले की ते आपल्याकडे यावेत असं वाटतं अशांपैकी हा आहे. चित्रपटात याची फॅमिलीही आहे. याचे वडील वयस्कर असल्यानं त्यांना उचलून लग्नात आणताना फुल धमाल होते. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे एखाद्या कॅरीकॅचरसारखं आहे. विजयनं सर्व कॅरेक्टर्स एकाच फ्रेममध्ये सादर केली आहेत. रिमा आणि मोहन जोशी यांनी एका गाण्यात अफलातून परफॅार्म केलं आहे. पॅडी कांबळे आणि हेमांगी कवीचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर येईल. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पहायला हवा अशी ईच्छाही जयवंत वाडकर यांनी व्यक्त केली.


Tags: Actor Director Vijay Patkargood newsJaywant WadkarmuktpeethVarhadi Vajantri Movieअभिनेते दिग्दर्शक विजय पाटकरचांगली बातमीजयवंत वाडकरमुक्तपीठवऱ्हाडी वाजंत्री चित्रपट
Previous Post

पुण्यातील ‘हे’ रूग्णालय ठरतयं लोकांसाठी आदर्श… मुलगी झाली तर, संपूर्ण प्रसूतीचे पैसे होतात माफ

Next Post

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Next Post
Florence Nightingale Award

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!