मुक्तपीठ टीम
सुमारे ७० वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेले चित्ते पंतप्रधान मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व चित्ते नामिबियातून भारतात आणण्यात आले आहेत. १९५२ मध्ये भारत सरकारने चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले होते. आज देशात चित्ते आले असले, तरी चित्ता, बिबट्या, वाघ आणि सिंह यातील फरक ओळखण्यात लोक गोंधळून जातात. हे प्राणी दिसायला सारखेच आहेत, पण त्यांच्यात खूप फरक आहे. त्यामुळे या चार प्राण्यांमधील फरक आम्ही सांगणार आहोत
सिंह, चिता, बिबट्या आणि वाघ यांच्यात नेमका फरक काय?
१) चित्ता
- चित्ता हा जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे.
- तो सुमारे १२० किमी वेगाने धावतो.
- ते कमी अंतरासाठी धावतात आणि सिंह किंवा वाघांपेक्षा बारिक असतात.
- चित्त्याचे डोके लहान असते आणि संपूर्ण शरीरावर काळे डाग दिसतात.
- त्याच्या चेहऱ्यावर काळे पट्टे असतात.
- चित्ता दिवसा शिकार करणे पसंत करतो.
२) बिबट्या
- बिबट्या भारताच्या अनेक भागात आढळतात आणि अनेकदा निवासी भागातही पोहोचतात.
- बिबट्या आणि चित्ता दिसायला जवळजवळ सारखेच असतात.
- चित्याच्या शरीरावर गोल ठिपके असतात आणि बिबट्याच्या शरीरावर गुलाबजामसारखे ठिपके असते.
- बिबट्या झाडांवरही चढू शकतात आणि ते अनेकदा त्यांच्या भक्ष्यासह झाडांवर चढतात.
- बिबट्याचे डोके चित्त्यापेक्षा मोठे आणि लांब असते आणि तो गर्जना करतो.
३) सिंह
- सिंह खूप शक्तिशाली असल्यामुळे त्याला जंगलचा राजा म्हटले जाते.
- सिंह ओळखणे खूप सोपे आहे.
- सिंहांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर लांब केस असतात आणि ते इतरांच्या तुलनेत थोडे आळशी असतात.
- सिंहाची लांबी सुमारे सात ते आठ फूट असते.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह नेहमी गर्दीत शिकार करतात.
४) वाघ
- वाघाच्या शरीरावर लांब पट्टे असतात.
- ते सिंहाच्या तुलनेत चपळ प्राणी आहेत.
- त्याचे पंजे जास्त मजबूत आहेत.
- त्याचे वजनही खूप जास्त असते आणि ते एकटेच शिकार करतात.
- ते पाण्यातही पोहू शकतात.
- हे मुख्यतः चीन, भारतासह पूर्व आशियाई प्रदेशांमध्ये आढळतात.