Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तानाजी सावंतांच्या “मराठा आरक्षणाची खाज” वक्तव्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
CM DCM Amd Tanaji Sawant

मुक्तपीठ टीम

आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मराठ्यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या विधानाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. तसं पत्र मराठा आंदोलकांनी सरकारला दिलं आहे.

मराठा आंदोलकांचं पत्र…

मा. नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मुंबई

मा. नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मुंबई

विषय:- मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत साहेब यांनी मराठ्यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या विधानाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्या संदर्भात….

महोदय :-
आपल्या मंत्री मंडळातील जबाबदार मंत्री श्री तानाजी सावंत यांच्या विषयी मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यांनी संपूर्ण मराठा समाजाने एकमताने घेतलेल्या भूमिकेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने हिनवण्याचा प्रयत्न केला. विरोध केला. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करतो.

तानाजी सावंत यांनी मराठा समाजाने घेतलेल्या ओबीसी मधून आरक्षण या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने विरोध केला. आमच्या सारख्या सर्वसामान्य गरीब मराठा आंदोलकांना विरोधी पक्षांनी सोडलेली पिलावळ असे संबोधित केले. तसेच आज ओबीसीतून आरक्षण मागत आहेत दोन महिन्यांनी ‘एस सी’ मधून मराठे आरक्षण मागतील. असे तथ्यहीन बेजबाबदार वक्तव्य केले.

त्यातून त्यांनी दलीत समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. उलट दलीत समाज मराठ्यांच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देतोय. कारण त्यां समाजातील जाणकार नेत्यांना माहिती आहे की मराठा समाज ‘एस सी’ चे आरक्षण मागत नाहीये. त्यामुळे दलीत मराठा असा विवाद होणार नाहीत. हे वास्तव तानाजी सावंत सर यांना माहिती नसावे.

हो! मराठ्यांची ओबीसी मधूनच आरक्षण ही ठाम मागणी आहे आणि राहील. ती समाजाची एकमुखी अन् सांविधानिक मागणी असताना एक जबाबदार मंत्री मराठ्यांच्या भूमिकेला विरोध करूच कसा शकतो?

याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टीकरण द्यावे असे सर्व समाजाला वाटत आहे. ओबीसी आरक्षण बाबत आणि तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सरकार ने भूमिका स्पष्ट करावी. यासंदर्भात महाराष्ट्रभरातून आपल्याला निवेदने पाठवली जातील. जर आपण या बाबीला हल्क्यात घेतले, तर मात्र तुमच्यासहित एकाही मंत्र्याला मराठा समाज माफ करणार नाही. गोरगरिब मराठा समाजाला भारत देश स्वतंत्र झाला तेंव्हा पासुन व्यवस्थेने डावलले आहे. जात म्हणून एकही लाभ मराठा समाजाला झाला नाही. मराठा समाज प्रचंड राष्ट्रप्रेमाणे ओतपोतने भरलेला आहे म्हणून अनेक गोष्टी सहन करत आला आहे. पण आता सर्व संयमाचा अंत होत आला आहे त्यामुळे सरकार म्हणून आपणास प्रचंड रोषाला सामोरे जावे लागण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. याची नोंद घ्यावी.

सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा

योगेश केदार
9822620666

प्रताप कांचन पाटील
+91 91757 36003

सुनील नागणे
8669253078

पाहा:

तानाजी सावंत म्हणतात, “…तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली!” मराठा समाजात संताप!!

तानाजी सावंत म्हणतात, “…तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली!” मराठा समाजात संताप!!


Tags: Cm Eknath ShindeDCM Devendra fadnavisHealth Minister Tanaji SawantMaharashtramarathaMaratha Reservationतानाजी सावंतमराठा आरक्षणमहाराष्ट्र
Previous Post

सिंह, चिता, बिबट्या आणि वाघ यांच्यातील फरक जाणून घ्या…

Next Post

महिमा नवरात्रौत्सवाचा…जाणून घ्या महत्वाची माहिती!

Next Post
Navratri 2022

महिमा नवरात्रौत्सवाचा...जाणून घ्या महत्वाची माहिती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!