मुक्तपीठ टीम
आता जेईई मेन परीक्षा २०२१ ला काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. प्रथम सत्राची परीक्षा २३ फेब्रुवारीपासून होणार असून २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २ सत्रात घेण्यात येईल. त्यानुसार प्रथम सत्र ९.०० ते दुपारी १२.०० अशी असेल. दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल.
या सत्र परीक्षेसाठी सुमारे ६,६१,७६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने यापूर्वीच परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. कार्ड www.jeemain.nta.nic.in या अधिकृत पोर्टलवर जारी करण्यात आले आहे, विद्यार्थी ते येथून डाउनलोड करू शकतात. यावर्षी ही परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रथमच इंग्रजीव्यतिरिक्त ओडिसा, मराठी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलगू, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, पंजाबी भाषेत परीक्षा घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चला या गोष्टी जाणून घेऊया.
जेईई मेन परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना
- अॅडमिट कार्डमध्ये नमूद केल्यानुसार परीक्षा केंद्रात शक्य असल्यास परीक्षेच्या एक दिवस आधी जा आणि घरापासून केंद्राचे अंतर तपासा.
- प्रवेशपत्रासह एक वैध फोटो आयडी असणे आवश्यक आहे.
- सेल्फ डिक्लरेशन विभागावर फोटो पेस्ट करा आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवा पण त्यावर सही करु नका. आपल्याला परीक्षा ठिकाणी शिक्षकांच्या उपस्थितीत साइन इन करावे लागेल.
- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मास्क वापरावा लागेल.
- एका पारदर्शक बाटलीमध्ये स्वत:चे सॅनेटाइजर आणा.
- आपली इच्छा असल्यास आपण पारदर्शक बाटलीत पिण्याचे पाणी आणू शकता.
- मोबाईल फोन किंवा बॅग्स कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक वस्तू आणू नयेत हे उमेदवारांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपले वैयक्तिक सामान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी अधिकारी घेणार नाहीत.
- मोबाईल, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक उपकरण, नोट पॅड, नोटबुक व पुस्तक इत्यादी परीक्षा केंद्रावर नेऊ नका.
- परीक्षेच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे लागते.