Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

February 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
rahul and soniya gandhi

मुक्तपीठ टीम

 

दिल्ली उच्च न्यायलयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधीना नोटीस बजावली आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या विषयावर कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे

 

कनिष्ठ न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य व्यक्तींवर खटला चालविण्यास नकार दिला होता. न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी १२ एप्रिलपर्यंत सोनिया आणि राहुल गांधी, एआयसीसीचे सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि ‘यंग इंडिया’ यांना सुब्रमण्यम स्वामींच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या खासगी गुन्हेगारी तक्रारीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय इतर लोकांवर नॅशनल हेरॉल्डकडून फसवणूक आणि बेकायदा उत्पन्न मिळवण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. मात्र, गांधींसह सर्व आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले.

 

नॅशनल हेराल्ड प्रकरण आहे तरी काय?

  • जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेले नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होते. त्यानंतर काँग्रेसशी २००८ पर्यंत संलग्न होते.
  • १ एप्रिल २००८ रोजी संपादकीयामधून हे वृत्तपत्र तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
  • असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) हे वृत्तपत्र बंद होण्याआधी चालवत होते.
  • तात्पुरत्या स्वरुपात बंद पडलेले हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्याचा निर्णय सोनिया गांधींनी २००९ मध्ये घेतला.
  • या वृत्तपत्रात सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांचा प्रत्येकी ३८ टक्के हिस्सा असलेल्या यंग इंडिया लिमिटेडने एजेएलचा संपूर्ण ताबा ९० कोटी रुपयांमध्ये घेतला.
  • २०११ मध्ये एजेएलचे संपूर्ण हस्तांतरण यंग इंडियाकडे करण्यात आले.
  • “हा ताबा फसवणुकीच्या माध्यमातून घेतला गेला, हजारो कोटी रुपयांची मालमत्ता काही कोटींच्या कर्जफेडीतून आणि ती ही कांग्रेस पक्षाच्या निधीतून…” असा आरोप ठेवत सुब्रमण्यम स्वामींनी न्यायालयात धाव घेतली.
  • अनेकवेळा झालेल्या सुनावणीमध्ये काँग्रेसने नोव्हेंबर २०१२ मध्ये बाजू मांडली की कुठल्याही व्यापारी उद्देशाने हा व्यवहार केलेला नसून नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र पुन्हा सुरू करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.
  • पण न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर स्वामींच्या आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.
  • तर आज या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायलयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरही उत्तर मागविले आहे.

 


Tags: CongressNational Herald caserahul gandhisoniya gandhiदिल्ली न्यायालयनॅशनल हेराल्ड प्रकरणराहुल गांधीसोनिया गांधी
Previous Post

कर्नाळा बँक खातेदारांच्या ठेवी प्रकरणी राज्य सरकार सकारात्मक: डॉ. निलमताई गोऱ्हे

Next Post

जेईई मेन परीक्षेला जाताना लक्षात ठेवा ‘हे’ सारं…

Next Post
JEE Main 2

जेईई मेन परीक्षेला जाताना लक्षात ठेवा ‘हे’ सारं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!