Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महिला सबलीकरणाचे ‘एसएनडीटी’चे कार्य अभिनंदनीय”

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

February 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
neelam-gorhe

मुक्तपीठ टीम

एसएनडीटी महिला महाविद्यालयात महिलांना केवळ रोजगार मिळविण्यासाठी शिक्षण दिले जात नाही तर त्याद्वारे महिलांचे सबलीकरण करण्याचे कार्य केले जाते. त्यांना उच्च शिक्षणासाठी आधुनिक संसाधने पुरविणे ही अभिनंदनीय बाब असून महिलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शासन सकारात्मक असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या होम सायन्स शाखेच्या एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ज्ञ या प्रयोगशाळेचे उद्घाटन व्हिडीओ कॅन्फरन्सिंगद्वारे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते झाला.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महाविद्यालयातील होम सायन्स विषयातील विद्यार्थीनी देशभर नव्हे तर जगभर कार्यरत आहेत. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थींनीसाठी एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ज्ञ प्रयोगशाळा भविष्यात नक्कीच लाभदायक ठरणार आहे. मनुष्याच्या बुद्धीचे आणि शारीरिक पोषण उत्तम रहाण्यासाठी या प्रयोगशाळेचे काम भविष्यात उपयुक्त ठरेल. ‘एसएनडीटी’स भविष्यातही शैक्षणिक कामांसाठी संपूर्ण सहकार्य राहील. अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे या अनुषंगाने काम करताना बाल व माता मृत्यू कमी करण्यासाठी उत्तम पोषण आहार तयार करण्यासाठी एस एन डी टी च्या प्रयोगशाळेने पुढाकार घेण्याचे आवाहन देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास माजी प्राचार्य एफ.झेड तारापोर, एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ.मुक्तजा मठकरी, डॉ.अर्चना विश्वनाथन, डॉ.नलिनी पाटील, प्राध्यापक जुमाले, प्राध्यापक कुलकर्णी आदिंसह महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थीनी आणि स्त्री आधार केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे प्रवीणा वालेकर यांनी या प्रयोगशाळेस अर्थसहाय्य केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Tags: Dr.Neelam GorheSNDT Universityएसएनडीटीपुणेमहिला महाविद्यालयहोम सायन्स शाखा
Previous Post

जेईई मेन परीक्षेला जाताना लक्षात ठेवा ‘हे’ सारं…

Next Post

अनिल गलगलींनी सांगितली स्वयंरोजगारासाठी त्रिसुत्री!

Next Post
Anil Galgali

अनिल गलगलींनी सांगितली स्वयंरोजगारासाठी त्रिसुत्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!