मुक्तपीठ टीम
सिबिल स्कोअर हा एखाद्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्याची गुणवत्ता सांगतो. सिबिल स्कोअर एखाद्याने कर्ज कसे घेतले आणि त्याची परतफेड केली, कर्जाची परतफेड वेळेवर झाली की नाही हे सांगते. कर्ज वेळेवर भरले तर त्याचा सिबिल स्कोर चांगला आणि कर्ज वेळेवर भरले नाही किंवा काही अडीबाजी केली तर सिबिल स्कोर खराब येतो. सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे अनेक वेळा बँका किंवा इतर वित्तीय संस्था कर्ज देण्यास नकार देतात. जर एखाद्याचा सिबिल स्कोर खराब असेल तर बँक किंवा वित्तीय संस्था त्याला कर्ज देत नाही. तर हा सिबिल स्कोर कसा तपासायचा त्यासाठी जाणून घ्या या सोप्या टीप्स…
कर्ज पात्रतेसाठीचा सिबिल स्कोर ठरवतात कसा?
- क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड किंवा सिबिल निर्णय घेते की बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देईल की नाही.
- क्रेडिट स्कोअर केवळ सिबिलद्वारे मोजला जातो आणि तपासला जातो.
- बँक किंवा वित्तीय संस्था तुमची आर्थिक स्थिती कशी आहे हे ठरवते.
- सिबिल स्कोअर ३०० ते ९०० पर्यंत आहे.
सिबिल स्कोअरची गणना कशी केली जाते?
- ज्याचा सिबिल स्कोअर चांगला आहे त्याला कर्ज घेण्याच्या अनेक सुविधा आहेत.
- त्यांना तुलनेने कमी दरात कर्ज मिळते.
- सिबिल स्कोअर एखाद्याच्या क्रेडिट इतिहासाच्या आधारे तयार केला जातो.
- सिबिल स्कोअर करण्यासाठी, गेल्या तीन वर्षांतील व्यवहारांचा हिशेब पाहिला जातो.
- नंतर त्या व्यक्तीचे सिबिल तयार केले जाते.
सिबिल स्कोअर कसा तपासायचा…
- सर्वप्रथम तुम्ही सिबिलच्या वेबसाइटवर क्लिक करा.
- यानंतर Get CIBIL स्कोर निवडा.
- तुमचा ईमेल आयडी, नाव आणि पासवर्ड टाका.
- आयडी पुरावा सबमिट करा.
- पिन कोड, फोन नंबर आणि जन्मतारीख टाका.
- यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
- यानंतर, डॅशबोर्डवर जाऊन तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता.
सिबिल स्कोर कसा सुधारावा…
- जर तुम्हाला खराब सिबिल स्कोअर टाळायचा असेल, तर सर्व प्रथम एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळा.
- कर्जाची वेळेत परतफेड करा
- तुमचा CIBIL अहवाल वेळोवेळी तपासत राहा.