Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पर्यटनाची स्वस्ताई : भारतीय रुपयापेक्षा जिथं चलन स्वस्त असे जगातील स्वस्त देश कोणते?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indian Currency

मुक्तपीठ टीम

प्रत्येकाचेच विदेशात फिरण्याचे एक स्वप्न असते. काहीजण हे स्वप्न पूर्णही करतात तर, काहींना आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट पाहावी लागते. परंतु, आता काळजी करण्याची गरजच नाही. जगात असेही काही देश आहेत जे भारतापेक्षाही स्वस्त आणि पर्यटनासाठी मस्त आहेत. याविषयी जाणून घेण्यासाठी ही बातमी उपयोगी ठरणार आहे. भारताबाहेर कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर, अशा ठिकाणांबद्दल जाणून घ्या जिथे भारतीय चलनाची किंमत खूप जास्त आहे. या देशांमध्ये राहणे, खाणे, पिणे, वाहतूक, हॉटेल आणि इतर कामांचा खर्च कमी आहे.

आता नवीन वर्ष सुरू होत आहे, यामुळे पर्यटक देश-विदेशात हे क्षण उत्साहात साजरा करण्याचा विचार करत आहेत. काही पर्यटकांनी तर, यासाठी आधीच बुकिंगही केल्या आहेत. तुम्हीही या शहरांना भेट द्या जिथे आपण श्रीमंत असल्याचे भासते. आत्तापासूनच तिकीट बुक करा.

भारताबाहेरील आणि भारतापेक्षाही स्वस्त ठिकाणांची यादी!

१. पॅराग्वे

  • पॅराग्वे जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे.
  • पॅराग्वेचे चलन पराग्वे गुआरानी आहे, जे भारतीय चलन रुपयापेक्षा कमी आहे.
  • या देशात राहणे, खाणे, पिणे, वाहतूक, हॉटेल आणि इतर गोष्टींचा खर्च कमी आहे.
  • जर कमी खर्चिक परदेशी सहल करायची असेल तर परदेशात पॅराग्वेला जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
  • पराग्वे पॅराग्वेयन गुआरानीचे चलन भारतीय चलनाच्या एक रुपयाच्या तुलनेत ८८.४६ आहे.

२. कंबोडिया

  • कंबोडिया हे पर्यटनासाठी स्वस्त आणि उत्तम ठिकाण आहे.
  • कंबोडियामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. या देशात राहणे, खाणे, पिणे, वाहतूक, हॉटेल आणि इतर गोष्टींचा खर्च कमी आहे.
  • जर नवीन वर्ष २०२३ मध्ये परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर कंबोडियाला भेट देऊ शकता.
  • कंबोडियन रिएलचे मूल्य भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत ४९.८२ रिएल आहे.

३. व्हिएतनाम

  • व्हिएतनाममध्ये नवीन वर्ष साजरे करणे हा एक संस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
  • येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
  • हे जगातील अशा देशांमध्ये समाविष्ट आहे, जेथे भारतीय चलन रुपयाचे मूल्य खूप जास्त आहे.
  • त्यामुळे भारतीय पर्यटकांसाठी हा देश स्वस्त होतो.
  • व्हिएतनाममध्ये भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये हो ची मिन्ह सिटी, फु क्वोक, डनांग, होई एन, हॅलोंग बे, दा नांग इत्यादींचा समावेश आहे.
  • व्हिएतनाममधील चलन भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत २८५.५२ डॉंग रिएल आहे.

४. मंगोलिया

  • मंगोलियाचे चलन भारतीय चलनापेक्षा स्वस्त आहे.
  • हा देश चीन आणि रशियासारख्या राष्ट्रांनी वेढलेला आहे.
  • हॉर्स राइड हा मंगोलियामध्ये पारंपारिकपणे एक जबरदस्त अनुभव आहे.
  • मंगोलियामध्ये प्रवास आणि खरेदी स्वस्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल, तर मंगोलिया तुमच्यासाठी बजेट-फ्रेंडली आहे.
  • मंगोलियामधील चलन भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत ४१.५ तुग्रीक आहे.

५. नेपाळ

  • नेपाळ भारताचा शेजारी देश असण्यासोबतच तो चांगला मित्र देशही आहे.
  • नेपाळमध्ये अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आहेत, जिथे तुम्ही कमी खर्चात प्रवास करू शकता.
  • पशुपतीनाथ मंदिर, बुद्ध मंदिर, सिम्बुनाथ मंदिर इत्यादी ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
  • भारतापेक्षा येथे गोष्टी स्वस्त आहेत, त्यामुळे तुम्ही खरेदीचा खूप आनंद घेऊ शकता.
  • नेपाळमधील चलन भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत १.६० नेपाळी रूपये आहे.

Tags: CambodiaCheapest Countries in the Worldgood newsIndiaindian currencyMongoliamuktpeethnepalParaguayTourismVietnamकंबोडियाघडलं-बिघडलंचांगली बातमीजगातील स्वस्त देशनेपाळपर्यटनपॅराग्वेभारतभारतीय चलनमंगोलियामुक्तपीठव्हिएतनाम
Previous Post

कर्ज पात्रतेसाठीचा सिबिल स्कोर ठरवतात कसा? जाणून घ्या ‘या’ टीप्स…

Next Post

आता देशी गाईंच्या दुधाचं खास बिस्किट! ITCचे SUPERMiLK!

Next Post
Supermilk Biscuits

आता देशी गाईंच्या दुधाचं खास बिस्किट! ITCचे SUPERMiLK!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!