मुक्तपीठ टीम
कृषी क्षेत्र आधुनिक करण्यासाठी सरकारक़डून पावलं टाकली जात आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून आता शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोनचा वापर करता येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली आहे. यानुसार ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी, ड्रोनच्या वापराचं ठराविक परिसरातलं अंतर, वजनाची क्षमता, गर्दीच्या परिसरातली निर्बंध, ड्रोनची नोंदणी, सुरक्षेच्या उपाययोजना, ड्रोन उड्डाण करण्यासाठीचं प्रमाणपत्र, वापरण्याची पद्धती, ड्रोनच्या वापराच्या भागाबाबतची माहिती, हवामान स्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन उतरवणं यासारख्या बाबींचा समावेश आहे.
कामगारांच्या समस्यांवर तोडगा
शेतकऱ्यांना पिकांमध्ये घुसून फवारणी करावी लागते, त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत ड्रोनचा वापर केल्यास अनेक फायदे होतील. ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळात अधिक भागांमध्ये फवारणी करता येऊ शकते. त्यासोबतच कामगारांच्या समस्यांचंही निराकरण होऊ शकेल.
एसओपीशी संबंधित महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे:
- भागाच्या मोजणीची जबाबदारी ड्रोन ऑपरेटरची असेल.
- ड्रोन ऑपरेटर हे परवानगी असलेल्याच औषधांची फवारणी करु शकतील.
- औषध फवारणी नियमानुसारच एका ठराविक उंचीवरुन केली जाईल.
- ड्रोनच्या वापराच्या २४ तास आधी संबंधित यंत्रणांना याची माहिती देणं आवश्यक आहे.
- ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांनाही लेखी स्वरुपात याची माहिती देणं बधनकारक राहिल.
- ड्रोन ऑपरेशनशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त त्या भागात कुणालाही परवानगी नसेल.
- ड्रोनच्या उड्डाणासाठी पायलट प्रशिक्षण दिलं जाईल.
- फक्त डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन (DGCA) प्रमाणित पायलटच कृषी ड्रोन उडवू शकतील.
- औषध फवारणीसाठी DGCA प्रमाणित ड्रोनचाच वापर केला जाऊ शकतो.
ड्रोनसंबंधी नेमक्या अडचणी कोणत्या?
- ड्रोन महागडे असल्याने सद्यस्थितीत सर्व शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करणं शक्य नाही.
- २०-३० लीटरची क्षमता असलेल्या ड्रोनची किंमत ५ लाखांच्या आसपास आहे.
- अशा स्थितीत अनेक ड्रोन कंपन्यांनी शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध करुन देण्याची योजनाही आणलेली आहे.
- कृषी ड्रोन कंपन्यांनी प्रति एकर ४० रुपये भाडं आकारलं आहे.
- २०-३० लीटर क्षमता असलेल्या ड्रोनच्या माध्यमातून १ एकर क्षेत्रात किटकनाशक फवारणी केली जाऊ शकते. यासाठी १५ ते २० मिनिटांचा अवधी लागेल.
- शेतकऱ्यांना फायदा आणि रोजगारनिर्मिती
- एसओपी जारी करत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की, ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदा होईल. यामुळे रोजगार वाढेल. कृषी क्षेत्राचं आधुनिकीकरण हे केंद्र सरकारच्या प्रमुखे अजेंड्यांपैकी एक आहे. त्यामुळेच कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाचा एसओपी: