Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता शेतीसाठी ड्रोनचं हायटेक तंत्रज्ञान, कृषी ड्रोन वापरासाठी एसओपी जारी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
agricultural drone

मुक्तपीठ टीम

कृषी क्षेत्र आधुनिक करण्यासाठी सरकारक़डून पावलं टाकली जात आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून आता शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोनचा वापर करता येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली आहे. यानुसार ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी, ड्रोनच्या वापराचं ठराविक परिसरातलं अंतर, वजनाची क्षमता, गर्दीच्या परिसरातली निर्बंध, ड्रोनची नोंदणी, सुरक्षेच्या उपाययोजना, ड्रोन उड्डाण करण्यासाठीचं प्रमाणपत्र, वापरण्याची पद्धती, ड्रोनच्या वापराच्या भागाबाबतची माहिती, हवामान स्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन उतरवणं यासारख्या बाबींचा समावेश आहे.

 

कामगारांच्या समस्यांवर तोडगा

शेतकऱ्यांना पिकांमध्ये घुसून फवारणी करावी लागते, त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत ड्रोनचा वापर केल्यास अनेक फायदे होतील. ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळात अधिक भागांमध्ये फवारणी करता येऊ शकते. त्यासोबतच कामगारांच्या समस्यांचंही निराकरण होऊ शकेल.

 

एसओपीशी संबंधित महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे:

  • भागाच्या मोजणीची जबाबदारी ड्रोन ऑपरेटरची असेल.
  • ड्रोन ऑपरेटर हे परवानगी असलेल्याच औषधांची फवारणी करु शकतील.
  • औषध फवारणी नियमानुसारच एका ठराविक उंचीवरुन केली जाईल.
  • ड्रोनच्या वापराच्या २४ तास आधी संबंधित यंत्रणांना याची माहिती देणं आवश्यक आहे.
  • ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांनाही लेखी स्वरुपात याची माहिती देणं बधनकारक राहिल.
  • ड्रोन ऑपरेशनशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त त्या भागात कुणालाही परवानगी नसेल.
  • ड्रोनच्या उड्डाणासाठी पायलट प्रशिक्षण दिलं जाईल.
  • फक्त डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन (DGCA) प्रमाणित पायलटच कृषी ड्रोन उडवू शकतील.
  • औषध फवारणीसाठी DGCA प्रमाणित ड्रोनचाच वापर केला जाऊ शकतो.

 

ड्रोनसंबंधी नेमक्या अडचणी कोणत्या?

  • ड्रोन महागडे असल्याने सद्यस्थितीत सर्व शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करणं शक्य नाही.
  • २०-३० लीटरची क्षमता असलेल्या ड्रोनची किंमत ५ लाखांच्या आसपास आहे.
  • अशा स्थितीत अनेक ड्रोन कंपन्यांनी शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध करुन देण्याची योजनाही आणलेली आहे.
  • कृषी ड्रोन कंपन्यांनी प्रति एकर ४० रुपये भाडं आकारलं आहे.
  • २०-३० लीटर क्षमता असलेल्या ड्रोनच्या माध्यमातून १ एकर क्षेत्रात किटकनाशक फवारणी केली जाऊ शकते. यासाठी १५ ते २० मिनिटांचा अवधी लागेल.
  • शेतकऱ्यांना फायदा आणि रोजगारनिर्मिती
  • एसओपी जारी करत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की, ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदा होईल. यामुळे रोजगार वाढेल. कृषी क्षेत्राचं आधुनिकीकरण हे केंद्र सरकारच्या प्रमुखे अजेंड्यांपैकी एक आहे. त्यामुळेच कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

वाचा एसओपी:

SOP for Drone

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Agriculture DroneDGCAकृषी ड्रोनडायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन
Previous Post

महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये वाढ! १६४८ नवे रुग्ण, महामुंबईत ११८०! ९१८ रुग्ण बरे! 

Next Post

लष्करासाठी ‘स्वदेशी-सुरक्षित-दणकट’ आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल

Next Post
AERV

लष्करासाठी ‘स्वदेशी-सुरक्षित-दणकट’ आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!