मुक्तपीठ टीम
मार्गात पुलाचा अडथळा असेल तर वळसा मारून जाणारं जहाज पाहिलं असेल. पण जहाजांना मार्ग करुन देण्यासाठी घडी होणारा पूल भारतात प्रथमच असणाराय. हा पूल म्हणजे देशाच्या दक्षिणेकडील समुद्रातील नवीन व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज. तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिला उभ्या लिफ्टचा रेल्वे सी-ब्रिज असलेला नवीन पांबन पूल लवकरच तयार होईल. नवीन पुलामध्ये शेसर रोलिंग लिफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा पूल मोठ्या जहाजांना जागा करून देण्यासाठी घडी घातल्यासारखा दोन बाजूंनी उभा होईल. तर एक भाग वर उंचही जाईल. याशिवाय पूल बनवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जे गाड्यांना वेगवान गती देईल तसेच अधिक भार वाहण्याची क्षमता घेईल.
Good News For Devotees of Ramanathaswamy Temple: Work on India’s First Vertical Lift Railway Sea Bridge is in full swing at Rameswaram, Tamil Nadu.
Foundation stone of this 2 KM long bridge, connecting Rameswaram on Pamban island & mainland India, was laid by PM @NarendraModi ji pic.twitter.com/HiOfLvYsXo
— Piyush Goyal (@PiyushGoyal) September 13, 2020
- व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी-ब्रिजचे बांधकाम ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाले.
- पुलाचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- नवीन ब्रिज सेन्सर रोलिंग लिफ्टवर काम करेल आणि ९० डिग्रीच्या कोनात उघडेल.
- नवीन तंत्रज्ञानामुळे गाड्यांना वेगवान गती मिळेल.
- स्टीमर किंवा जहाजे जाण्यासाठी पुलाचा भाग ६३ मीटर लांबीचा असेल, जो समुद्रसपाटीपासून २२ मीटर उंच असेल.
कसा आहे व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी-ब्रिज?
- हा पूल सुमारे २ किलोमीटर लांबीचा असेल.
- त्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गाड्यांना वेगवान गतीसह अधिक वजन वाहन नेणे शक्य होणार आहे.
- पर्यटकांच्या वाहतुकीलाही चालना मिळणार आहे.
- हा पूल ६३ मीटर लांबीचा असेल.
- हा पूल समुद्रसपाटीपासून २२ मीटर उंच असेल.
- हा पूल इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीवर चालणार आहे.
- हे ट्रेन कंट्रोल सिस्टमसह समक्रमितपणे कार्य करते.
- हा पूल बांधण्यासाठी सुमारे ५६० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
- दोन किलोमीटर लांबीचा पूल भारतातील पहिला ‘व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज’ आहे.
- आधीच्या पुलावर रेल्वेगाड्या १० किमी वेगाने धावत होत्या
- नवीन पुलावरील रेल्वेगाड्या ८० किमी प्रतितास वेगाने धावतील.
भाविक आणि यात्रेकरूंसाठी ठरेल वरदान
- वर्टिकल लिफ्ट रेल्वे सी-ब्रिज रामेश्वरम आणि धनुषकोडीला प्रवास करणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंसाठी वरदान ठरेल.
- जुन्या पुलावर मालगाड्यांना बंदी होती
- नवीन पुलावरून मालगाड्यांना परवानगी दिली जाईल.
- गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच हा पूल कार्यान्वित होणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे त्याला विलंब झाला.