Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास नंबर १! टीव्ही 9 मराठी दुसऱ्या क्रमांकावर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TV Rating

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

निलेश खरे संपादक असलेल्या झी २४ तासने अखेर मराठीतील पहिल्या क्रमांकाचं न्यूज चॅनल होण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यांनी ०.७ने वाढ नोंदवत २७.६ मार्केट शेअर मिळवला आहे. गेले १६ आठवडे पहिल्या क्रमांकावर अधिराज्य गाजवणाऱ्या टीव्ही 9 मराठी या आठवड्यात ०.६ घटीसह २६.८ मार्केट शेअरसह दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. एबीपी माझा पुन्हा ०.५ने मागे गेला आहे. तर चौथ्या क्रमांकावरील सामने ०.५ने वाढ नोंदवली आहे. न्यूज १८ लोकमत प्रगती कायम राखत पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीचा मार्केट शेअर ०.१ ने कमी होत ४.७वर गेला आहे.

झी २४ तासने मिळवलेल्या पहिल्या क्रमांकात सर्वात मोठा वाटा ग्रामीण भागातील प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आहे. त्या सेगमेंटमध्ये त्यांना ३६.५ टक्के मार्केट शेअर लाभला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर गेलेले टीव्ही 9 मराठी त्या सेगमेंटमध्येही दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना तेथे फक्त २२ टक्के मार्केट शेअर मिळाला आहे. या सेगमेंटमध्ये असलेला फरक झी २४तासला मोठी उभारी देणारा तर टीव्ही 9 मराठीसह इतर चॅनल्सना भोवणारा ठरल्याचं दिसत आहे.

टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…

  • हा या वर्षातील २२ वा आठवडा आहे.
  • पण न्यूज चॅनलचे स्थगित असलेले रेटिंग सुरु झाल्यानंतरचा हा १७वा आठवडा आहे.
  • रेटिंग सुरु झाल्यानंतर या आठवड्यात प्रथमच मराठी चॅनल्सच्या मार्केट शेअरमधील स्थानांमध्ये फरक झालेला आहे.
  • मराठीतील सहा न्यूज चॅनल्सच्या रेटिंगमध्ये झी २४ तास पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यांच्यात ०.७ची वाढ आहे.
  • टीव्ही 9 मराठी चॅनल आता दुसऱ्या स्थानी आहे. मार्केट शेअर ०.६ने कमी झाला आहे.
  • एबीपी माझा ०.५ने मागे गेले आहे.
  • साम या आठवड्यात ०.५ने पुढे गेले आहे.
  • न्यूज 18 लोकमत याही आठवड्यातही वाढले आहे.
  • लोकशाही सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांचा मार्केट शेअर याही आठवड्यात ०.१ने कमी झाला आहे.

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात पहिल्या क्रमांकावर आता २७.६% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे.०.७ची वाढ आहे. वाढीत सातत्य आहे.
  • गेले १६ आठवडे पहिल्या क्रमांकावर असलेले टीव्ही9 मराठी २६.८ मार्केट शेअरसह आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात ०.६ ची घट आहे. गेले काही आठवडे सतत घट आहे.
  • एबीपी माझा १८.६ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.५ची घट आहे.
  • साम टीव्हीने ०.५ची वाढ झाली असून १२.२% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे
  • पाचव्या क्रमांकावर १०.१% मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. वाढीत सातत्य आहे.
  • सहाव्या क्रमांकावर ४.७ % मार्केट शेअरसह लोकशाही आहे. त्यांच्यात ०.१ची घट आहे.

(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
नक्की पाहा:

टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?

गेल्या आठवड्यात कसं होतं मराठी न्यूज चॅनल्सचं रेटिंग…

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठीचं क्रमांक एकचं स्थान धोक्यात? झी २४ तास अवघ्या ०.५ ने मागे!

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठीचं क्रमांक एकचं स्थान धोक्यात? झी २४ तास अवघ्या ०.५ ने मागे!


Tags: Marathi News ChannelNilesh KhareTRPTV 9TV RatingZee 24 Taasझी २४ तासटीव्ही रेटिंगनिलेश खरेमराठी न्यूज चॅनल्स
Previous Post

राज्यात २८१३ नवे रुग्ण, १०४७ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post

देशातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट पूल, जहाजांना जाण्यासाठी करुन देणार जागा!

Next Post
First Sea Vertical Bridge

देशातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट पूल, जहाजांना जाण्यासाठी करुन देणार जागा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!