Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पवित्र तीर्थ, स्वच्छ तीर्थ: तीर्थस्थानांच्या स्वच्छतेसाठी केंद्राचा राज्यांकडे आग्रह

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Chardham Yatra

मुक्तपीठ टीम

तीर्थस्थळी भक्तांची प्रचंड गर्दी असतेच असते. काही भक्तांकडून तीर्थस्थळी होणारी अस्वच्छता हा चिंतेचाच विषय. तीर्थस्थानी मनातील भक्तिभावासह आलेल्या भक्तांना ही अस्वच्छता डाचणारीच. या अस्वच्छतेला दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छ तीर्थयात्रेवर भर देत केंद्र सरकारने पहिला टप्पा म्हणून उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि ओडिशा सरकारला निर्देश दिले आहेत. यामध्ये या राज्यांना केदारनाथ यात्रेसह चार धाम यात्रा, आगामी अमरनाथ यात्रा आणि जगन्नाथ रथयात्रेत कमालीची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांनी यासंदर्भात तीन राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर महिला आणि पुरुषांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे.

मंत्रालयाने सांगितले की, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि ओडिशामधील तयारीचा आढावा घेण्यासाठी टीम नियुक्त करण्यात आली आहे. ही टीम तेथे जाऊन स्वच्छता राखण्यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेणार आहेत, तसेच स्वच्छतेबाबत आपल्या सूचना देणार आहेत. पुढील आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तयारीबाबत राज्य, शहर आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता राखण्याचे निर्देश

  • सर्व शौचालये नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य ठेवावीत.
  • यासोबतच तीर्थक्षेत्राकडे जाणार्‍या रस्त्यांलगत असलेले ढाबे, रेस्टॉरंट आणि इतर खाण्यापिण्याची दुकाने स्वच्छ करून याठिकाणी कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.

अमरनाथ आणि जगन्नाथ यात्रेचे व्यवस्थापन

  • उत्तराखंडमधील बद्रीनाथ यात्रा ८ मेपासून तर केदारनाथ यात्रा ६ मेपासून सुरू आहे.
  • त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून ती ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
  • ओडिशामध्ये १ जुलैपासून जगन्नाथ यात्रा होणार आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: central GovernmentChar Dham YatraCleanlinessHoly PlaceJammu KashmirManoj JoshiOdissaUtrakhandकेंद्र सरकारमनोज जोशीस्वच्छता
Previous Post

देशातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट पूल, जहाजांना जाण्यासाठी करुन देणार जागा!

Next Post

साताऱ्यातील प्रशिक्षणार्थींच्या बसला हिमाचलप्रदेशात अपघात, रावसाहेब दानवेंच्या मदतीनं सुखरुप घरी!

Next Post
Raosaheb Patil Danve saved satara's Mountaineering trainees

साताऱ्यातील प्रशिक्षणार्थींच्या बसला हिमाचलप्रदेशात अपघात, रावसाहेब दानवेंच्या मदतीनं सुखरुप घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!