Rohini Thombare

Rohini Thombare

*मनोरंजन महत्त्व* : १) बिग बॉसच्या चौदाव्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवत अभिनेत्री रुबीना दिलैक ही विजेता झाली. तिने चाहत्यांचे मनभरून आभार मानले. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे. २) तरूणाईंच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या कार्तिकची आता पुन्हा एकदा धडाकेबाज एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. यात अक्षय कुमार नाही तर, कार्तिक असणार आहे. तसेच त्याच्यासोबच कियारा अडवाणी आणि तब्बू यादोघी मुख्य भूमिकेत आहेत. ३) आदेश बांदेकर यांच्या मुलाने कलाविश्वात पदार्पण करणार आहेल. स्टारकिड्सच्या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचे नावदेखील जोडले गेले आहे. आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ४) राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. हा सिनेमा हॉरर कॉमेडी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. काही तासातचं या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. ५) कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’मधील श्रीधरने विश्वासघात केल्यानंतर संग्रामने स्वातीला मैत्रीचा आधार देत तिला सांभाळून घेतले. विशेष म्हणजे याच संग्रामसोबत आता स्वाती लग्नगाठ बांधणार असून दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.

Tobacco Divorce

पत्नी तंबाखू खाते म्हणून घटस्फोट मिळणार नाही! न्यायालयाने पतीला ठणकावले!!

मुक्तपीठ टीम   मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालानुसार, पत्नीची तंबाखू खाण्याचे व्यसन जरी...

मनोरंजन महत्वाचं – • बॉलीवूडची बेबो आता पुन्हा एकदा आई झालीय. पतौडींच्या घराण्यात नव्या पाहुण्याचा आगमन झाले आहे. तैमूरला आता लहान भाऊ मिळालाय. सैफ अली खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘its a boy..’ अशी पोस्ट करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या बातमीनंतर चाहत्यांसोबतच बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत. • बॉलीवूडची गाणी म्हटलं की, समोर नावं येतात ती प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि गायक अरिजीत सिंह. तरूणाईमध्ये या दोघांचे आकर्षण जास्त पाहण्यास मिळते. सध्या नेहा ‘इंडियन आयडॉल १२’ची परीक्षक आहे. तिने या मंचावर तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. नेहाला एंग्जाइटी इश्यू असून याविषयी बोलताना ती भावूक झाली. • आपला लाडका परश्या लवकरच वेब मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सैराट’ या चित्रपटातून पदार्पण केलेला आणि सर्वांच्या परिचयाचा झालेला अभिनेता आकाश ठोसर हा ‘डिस्ने हॉटस्टार’वरील ‘१९६२ -द वॉर इन द हिल्स’ या वेब मालिकेत महत्वाची भूमिका साकारतो आहे. • सैराट, फँड्री असे ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. नागराज यांचा हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल देणार आहेत. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. • अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनोख्या शैलीत महाराजांना वंदन केले आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. • रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो शेअर करत तिने, “छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता” असे कॅप्शन दिली आहे. यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे.

muktpeeth top 10muktpeeth top 10

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com रविवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र रविवार, २१ फेब्रुवारी २०२१ शेतकऱ्यांनंतर आता नोकरदार...मोदी सरकार, कमी होणार पगार? http://muktpeeth.com/will-the-salaries-of-the-employees-be-reduced/ जगातील...

1) शाहिद कपूर त्याच्या नवीन वेब सीरिजमधून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. अभिनेता शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या थ्रिलर सीरिजची निर्मिती करत आहेत. आता त्यांच्या आगमी सीरिजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. 2) दियाच्या लग्नाच्या सगळ्या विधी एका पुजारीन महिलेने केल्या आहेत. त्याची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा १५ फेब्रुवारी २०२१ रोजी बंधनात अडकली. दियाने सोशल मीडियावर तिच्या लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने एका शेअर केलेल्या फोटोत महिला पुजारी दिसत आहे. आता पर्यंत कधीच कोणत्याही लग्नात आपण महिला पुजारीला पाहिलं नसेल. त्यामुळे याबाबत सगळीकडे चर्चा पसरली आहे. 3) नेहा कक्करने आर्थिक संकटात असणाऱ्या ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद यांना मदत केली आहे. प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना इंडियन आयडल टीमने कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. संतोष आनंद यांनी प्यारे लालजींसोबत काम केलेले आहे. सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे शोमध्ये सांगितले आहे. त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाबद्दल ऐकून शोची परिक्षक नेहा कक्करने त्यांना ५ लाख रुपये देण्याचे ठरवले. 4) अभिनेता के.के मेनन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोशल मीडियावर केला फोटो शेअर, हिंदीसोबतच गुजराती, तामीळ आणि तेलगू सिनेमांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकणारा के.के मेनन या अभिनेत्याला या पुरस्काराने सन्मानित केले आहे. 5) आता दिलजीत दोसांजसोबत झळकणार सर्वांची चाहती शहनाज,‘हौसला रख’चा फर्स्ट लूक आउट. बिग बॉस 13 ची सर्वांची आवडती स्पर्धक शहनाजला एकामागून एक नवे प्रोजेक्ट मिळू लागले आहेत. आता पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांजसोबत ‘हौसला रख’ या सिनेमातून झळकणार आहे.

celebrity

प्रभासचा ‘राधेश्याम’ वेशभूषा खर्च सहा कोटी! असा खर्च करणारे टॉप-५ कोणते?

  बॉलिवूड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते स्टईल, मेकअप, हिरो-हिरोईनचा पोशाख, ते पाहण्यास एक वेगळीच मज्जा येते. बॉलिवूडमध्ये चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे...

*मनोरंजन महत्त्वाचं* 1) झी मराठीवर अण्णा नाईकांची पुन्हा एन्ट्री होणार आहे.‘रात्रीस खेळ चाले’सारख्या झी मराठी वाहिनीवरील या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. या मालिकेतील सर्व पात्रांना लोकांचे प्रेम मिळाले होते. आता अण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशी चर्चा सगळीकडे पसरताना दिसतेय. झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अण्णा नाईक परत येत आहेत हे लोकांना कळवलं आहे. 2) बिग बींना म्हणजेच अमिताभजींना चित्रपटसृष्टीत ५२ वर्षे पूर्ण झाले. ट्विट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी आजवर कधी मागे वळून पाहिले नाही. 3) डान्सिंग क्विन नोरा फतेही देतेय डान्सचे धडे! आपल्या अदा, डान्स आणि फोटोशूटने प्रेक्षकांचे मन घायाळ करणारी नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडमधील टॉप डान्सरमध्ये सध्या नोराला मानलं जात आहे. नुकतेच रिलीज झालेले ‘छोड देंगे’ या गाण्याचे संगीतकार सचेत टंडन आणि गायिका परंपरा ठाकूर या दोघांनाही नोरा डान्स शिकवत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. 4) ‘पाहिले न मी तुला’ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू होणार असून यात अभिनेता शशांक केतकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत सुयश पटवर्धनची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कुलकर्णी आणि नवीन अभिनेत्री तन्वी मुंडले हे दोघेही नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 5) बापाची लाडाची लेक करतेय रंगमंचावर पदार्पण, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे हीने अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहेत.लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे रंगमंचावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

*मनोरंजन महत्वाचं* १) ती सध्या काय करते नंतर आता अभिनय बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा येणार आहे. अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मिडीयाद्वारे याबाबत माहिती दिली. २) अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमीच चर्चेत असते, याशिवाय ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. एका युजरने नुकतेच दीपिकाला इन्स्टाग्रामवर मेसेज करून अपशब्द वापरले. दीपिकाने त्याला थेट कोणतीही प्रतिक्रिया न देता, तिने त्याच्या मेसेजचे स्क्रिनशॉट काढून तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आणि यासोबतच तिने लिहिले, ‘छान! तुझे कुटुंबीय आणि मित्रांना तुझा नक्कीच अभिमान वाटेल.’ ज्यावर दीपिकानंही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. ३) अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राची मुलगी समिषा आज १५ फेब्रुवारी रोजी एक वर्षांची झाली आहे. शिल्पाने आजपर्यंत तिच्या मुलीचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. समिषाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने तिने एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समिषा ‘मम्मा’ बोलताना दिसत आहे. ४) दंगल म्हटलं की आठवतो तो अभिनेता आमिर खान, यावर्षी तो एकाचवेळी तीन चित्रपटांवर काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तो व्यक्तिरेखेत शिरून, खूप मन लावून भूमिका करतो. त्यासाठी मेहनतही घेतो म्हणूनच तो वर्षांला एकच चित्रपट करायचे हे सूत्र गेली कित्येक वर्ष तो जपत आला आहे. मात्र पूर्वीप्रमाणे एक वर्ष, एक चित्रपट हे त्याचे समीकरण आता यापुढे राहणार नाही अशी चर्चा आहे.

pulwama attack

पुलवामा हल्ल्याची दोन वर्षे…१३ दिवसात भारतानं घेतला होता बदला!

रोहिणी ठोंबरे पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्षे झाली. पाकिस्तान पुरस्कृत भेकडांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मुक्तपीठची भावपूर्ण...

Page 292 of 295 1 291 292 293 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!