Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पत्नी तंबाखू खाते म्हणून घटस्फोट मिळणार नाही! न्यायालयाने पतीला ठणकावले!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Tobacco Divorce

मुक्तपीठ टीम

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालानुसार, पत्नीची तंबाखू खाण्याचे व्यसन जरी वाईट असली तरीही तिला घटस्फोट देण्यासाठी हे कारण पुरेसे नाही, असे मत व्यक्त करीत खंडपीठाने २१ जानेवारी २०१५ रोजी नागपूर फॅमिली कोर्टाने दिलेला निर्णयही फेटाळून लावला.

 

न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठाने निकाल दिला की, पतीने केलेले आरोप सामान्य आहेत. पत्नीला तंबाखू खाण्याची सवय असल्याने पत्नीवर उपचार करण्यासाठी  बरीच रक्कम खर्च करावी लागली, असे पतीचा आरोप आहे. परंतु पतीने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावा म्हणून वैद्यकीय कागदपत्रे आणि बिल रेकॉर्ड न्यायालयात सादर केले नाहीत.

 

घटस्फोट घेण्यासाठी पतीने दिलेले कारण गंभीर नाही. घटस्फोट घेतल्यास त्यांच्या मुला-मुलीचे मोठे नुकसान होईल आणि त्यांच्या संगोपनावर परिणाम होईल. दोन्ही मुलांच्या हितासाठी वैवाहिक बंधन राखणे आवश्यक आहे.

 

या जोडप्याचे १५ जून २००३ रोजी लग्न झाले होते. काही दिवसानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा खटला दाखल केला. पतीने घटस्फोटाचे कारण पत्नीला तंबाखू चघळण्याची सवय असल्याचे समोर आणले. तसेच ती घरातील कामेही करत नाही, भांडत राहते असेही आरोप केले होते.

 

न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “हे आरोप विवाहित जीवनातील कुरबुरींचा एक भाग आहे.” मानसिक क्रूरतेच्या कारणावरून पतीने घटस्फोट घेण्याची मागणी केली पण त्याला ते सिद्ध करता आले नाही. याउलट त्याने कबूल केले की, २००८ मध्ये तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. तरीसुद्धा पत्नी २०१० पर्यंत त्याच्यासोबत राहिली.

 

हायकोर्टाने काही जुन्या निकालांचा हवाला देत म्हटले आहे की, विवाहित जीवनाचे संपूर्ण मूल्यांकन केले पाहिजे, क्षुल्लक कारणांवरून क्रूरता सिद्ध केली जाऊ शकत नाही.


Tags: divorcenagpur bench of mumbai highcourttobaccoतंबाखूनागपूर खंडपीठमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

मनोरंजन महत्वाचं – • बॉलीवूडची बेबो आता पुन्हा एकदा आई झालीय. पतौडींच्या घराण्यात नव्या पाहुण्याचा आगमन झाले आहे. तैमूरला आता लहान भाऊ मिळालाय. सैफ अली खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘its a boy..’ अशी पोस्ट करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या बातमीनंतर चाहत्यांसोबतच बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत. • बॉलीवूडची गाणी म्हटलं की, समोर नावं येतात ती प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि गायक अरिजीत सिंह. तरूणाईमध्ये या दोघांचे आकर्षण जास्त पाहण्यास मिळते. सध्या नेहा ‘इंडियन आयडॉल १२’ची परीक्षक आहे. तिने या मंचावर तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. नेहाला एंग्जाइटी इश्यू असून याविषयी बोलताना ती भावूक झाली. • आपला लाडका परश्या लवकरच वेब मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सैराट’ या चित्रपटातून पदार्पण केलेला आणि सर्वांच्या परिचयाचा झालेला अभिनेता आकाश ठोसर हा ‘डिस्ने हॉटस्टार’वरील ‘१९६२ -द वॉर इन द हिल्स’ या वेब मालिकेत महत्वाची भूमिका साकारतो आहे. • सैराट, फँड्री असे ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. नागराज यांचा हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल देणार आहेत. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. • अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनोख्या शैलीत महाराजांना वंदन केले आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. • रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो शेअर करत तिने, “छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता” असे कॅप्शन दिली आहे. यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे.

Next Post

“महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक,धार्मिक सर्व कार्यक्रमांवर बंदी!” – मुख्यमंत्री ठाकरे

Next Post
CM Uddhav Thackeray mask

"महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक,धार्मिक सर्व कार्यक्रमांवर बंदी!" - मुख्यमंत्री ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!