मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेन युद्धात कर्नाटकाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा . मेडिकल महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सीपी गुरनानी यांना यावर काम करण्यास सांगितले आहे. आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी एक ट्विट केले. देशात वैद्यकीय महाविद्यालयांची एवढी समस्या असल्याची मला कल्पना नव्हती, असे सांगितले. त्यांनी पुढे लिहिले की, ‘सीपी गुरनानी, आपण महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वैद्यकीय संस्था उघडण्याचा विचार करू शकतो का?’
खाजगी महाविद्यालयात फी जास्त
- अशा वेळी आनंद महिंद्रा यांचे ट्विट आले आहे.
- जेव्हा हजारो भारतीय वैद्यकीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
- त्यांना तिथून सुखरूप आणण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले आहे.
- देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी आणि खाजगी महाविद्यालयातील महागड्या फीमुळे दरवर्षी भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात.
- एका आकडेवारीनुसार, युक्रेनमध्ये सुमारे १८,००० भारतीय वैद्यकीय विद्यार्थी आहेत.
- याशिवाय चीनमध्ये २३ हजार भारतीय विद्यार्थी आणि रशियामध्ये सुमारे १६ हजार भारतीय विद्यार्थी आहेत.
NEET परीक्षेला १६ लाख उमेदवार बसले होते
- राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मते, भारतात सुमारे ६०५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
- ज्यामध्ये एमबीबीएसच्या ९०,८२५ जागा आहेत.
- २०२१ मध्ये या जागांसाठी सुमारे १६ लाख उमेदवारांनी NEET ची परीक्षा दिली होती.
- सुमारे ९७% मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही.
- यामुळे विद्यार्थ्यांना युक्रेन, रशिया, चीन, बेलारूस, जॉर्जिया, आर्मेनिया आदी देशांमध्ये शिक्षणासाठी जावे लागते.
- भारतातील खाजगी महाविद्यालयांच्या तुलनेत या देशांमध्ये शुल्क कमी आहे.
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनंतर अनेक युजर्सनी याला चांगली वाटचाल म्हटले आहे. ते म्हणाले की, भारतातून मोठ्या संख्येने विद्यार्थी वैद्यकिय शिकक्षणासाठी परदेशात केवळ जागांच्या कमतरतेमुळेच जात नाहीत, तर भारतात शिक्षण घेणेही महागडे आहे. याबाबत एका वापरकर्त्याने महिंद्राला त्यांच्या संस्थेतील शुल्कावर लक्ष ठेवण्यासीठी विनंती केली. यावर आनंद महिंद्रा यांनी लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले.