मुक्तपीठ टीम
प्रयागराज येथे १९ नोव्हेंबरला इंदिरा मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण स्टेडियम भारत माता की जयच्या जयघोषाने दुमदुमला होता. इंदिरा मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या विक्रम बंगारियाने ४२.१९५ किमीची शर्यत पूर्ण केल्यानंतर मदन मोहन मालवीय स्टेडियममध्ये प्रवेश केला. अंतिम रेषेवर पोहोचताना विक्रम बंगारिया डगमगला आणि फिनिश लाईनवरच कोसळला. लोकांनी लगेच त्याला उचलून धीर दिला. एवढच नाही तर इतर अनेक धावपटू अंतिम रेषेपूर्वी कोसळले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. स्टेडियममध्ये डॉक्टरांच्या टीमसह अनेक रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती.
इलेक्ट्रॉनिक चिपविना मॅरेथॉन!
- इंदिरा मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक चिपसाठी शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत अनेक धावपटूंना त्रास झाला.
- शुक्रवारीच स्टेडियममध्ये धावपटूंना इलेक्ट्रॉनिक चिपचे वाटप करण्यात येणार होते.
- सकाळी उद्घाटनाच्या ठिकाणी ही चिप वितरित करण्यात येणार असल्याचे धावपटूंना सांगण्यात आले.
- पण यावेळी त्यांना चिपशिवायच पळावे लागणार हे कळले.
- फेडरेशन ऑफ इंडिया ही चिप दिल्लीहून पाठवते.
- वाहनांच्या बिघाडामुळे ती वेळेवर पोहोचू शकली नाही.
मॅरेथॉनमध्ये ४१९ धावपटूंचा सहभाग…
- केवळ नऊ टक्के लोकांनी निर्धारित वेळेत शर्यत पूर्ण केली.
- पुरुष गटात तीन तास आणि महिला गटात साडेतीन तासांत शर्यत पूर्ण करणाऱ्या विजेत्यांनाच प्रमाणपत्र दिले गेले.
- मॅरेथॉनमध्ये एकूण ४१९ धावपटूंनी भाग घेतला होता.
- पुरुष विभागात ३३६ आणि महिला विभागात ८३ धावपटूंचा समावेश आहे.
- पुरुष विभागातील फक्त २४ धावपटू तीन तासांत आणि महिला विभागातील फक्त १४ धावपटू साडेतीन तासांत अंतिम फेरी गाठली आहे.
- एकूण संख्येच्या हे प्रमाण केवळ नऊ टक्के आहे.
- मॅरेथॉननंतर अव्वल १४ धावपटूंव्यतिरिक्त बहुतांश धावपटू स्टेडियम सोडून गेले होते.
- त्यामुळे या धावपटूंना प्रमाणपत्र देता आले नाही.
- वेळेत शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना विभागीय क्रीडा कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिले गेले.