Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राचा विक्रम उत्तरप्रदेशच्या मॅरेथॉनमध्ये अंतिम रेषेवर पोहचताच कोसळला…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vikram Bangaria

मुक्तपीठ टीम

प्रयागराज येथे १९ नोव्हेंबरला इंदिरा मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण स्टेडियम भारत माता की जयच्या जयघोषाने दुमदुमला होता. इंदिरा मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या विक्रम बंगारियाने ४२.१९५ किमीची शर्यत पूर्ण केल्यानंतर मदन मोहन मालवीय स्टेडियममध्ये प्रवेश केला. अंतिम रेषेवर पोहोचताना विक्रम बंगारिया डगमगला आणि फिनिश लाईनवरच कोसळला. लोकांनी लगेच त्याला उचलून धीर दिला. एवढच नाही तर इतर अनेक धावपटू अंतिम रेषेपूर्वी कोसळले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. स्टेडियममध्ये डॉक्टरांच्या टीमसह अनेक रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती.

इलेक्ट्रॉनिक चिपविना मॅरेथॉन!

  • इंदिरा मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक चिपसाठी शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत अनेक धावपटूंना त्रास झाला.
  • शुक्रवारीच स्टेडियममध्ये धावपटूंना इलेक्ट्रॉनिक चिपचे वाटप करण्यात येणार होते.
  • सकाळी उद्घाटनाच्या ठिकाणी ही चिप वितरित करण्यात येणार असल्याचे धावपटूंना सांगण्यात आले.
  • पण यावेळी त्यांना चिपशिवायच पळावे लागणार हे कळले.
  • फेडरेशन ऑफ इंडिया ही चिप दिल्लीहून पाठवते.
  • वाहनांच्या बिघाडामुळे ती वेळेवर पोहोचू शकली नाही.

मॅरेथॉनमध्ये ४१९ धावपटूंचा सहभाग…

  • केवळ नऊ टक्के लोकांनी निर्धारित वेळेत शर्यत पूर्ण केली.
  • पुरुष गटात तीन तास आणि महिला गटात साडेतीन तासांत शर्यत पूर्ण करणाऱ्या विजेत्यांनाच प्रमाणपत्र दिले गेले.
  • मॅरेथॉनमध्ये एकूण ४१९ धावपटूंनी भाग घेतला होता.
  • पुरुष विभागात ३३६ आणि महिला विभागात ८३ धावपटूंचा समावेश आहे.
  • पुरुष विभागातील फक्त २४ धावपटू तीन तासांत आणि महिला विभागातील फक्त १४ धावपटू साडेतीन तासांत अंतिम फेरी गाठली आहे.
  • एकूण संख्येच्या हे प्रमाण केवळ नऊ टक्के आहे.
  • मॅरेथॉननंतर अव्वल १४ धावपटूंव्यतिरिक्त बहुतांश धावपटू स्टेडियम सोडून गेले होते.
  • त्यामुळे या धावपटूंना प्रमाणपत्र देता आले नाही.
  • वेळेत शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना विभागीय क्रीडा कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिले गेले.

Tags: Indira MarathonMaharashtraUttarpradeshVikram Bangariaइंदिरा मॅरेथॉनमहाराष्ट्रविक्रम बंगारिया
Previous Post

#RIPTwitter ट्विटर बंद होण्याबद्दल एलॉन मस्क काय म्हणाले?

Next Post

भारतीय रेल्वे लवकरच विजेवर धावणार, डिझेल इंजिन बंद होणार!

Next Post
Indian Railways

भारतीय रेल्वे लवकरच विजेवर धावणार, डिझेल इंजिन बंद होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!