मुक्तपीठ टीम
डास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना आला की, देशात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे रोग काही प्रकरणांमध्ये गंभीर आणि प्राणघातक देखील असू शकतात. पण आपल्यालाही काही वेळेस हा प्रश्न पडतो की, हे डास जास्त आपल्याला का चावतात? नुकतेच, एका अभ्यासात, शास्त्रज्ञांनी काही लोकांमध्ये जास्त डास चावण्याचे कारण शोधले आहे.
काही लोकांमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे डास त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. यामुळेच इतरांपेक्षा जास्त डास त्यांना चावतात.
डास काही लोकांना जास्त चावतात यामागचे कारण कोणते?
- काही लोकांना डास जास्त का चावतात याची कारणे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांच्या टीमने ६४ सहभागींवर अभ्यास केला.
- अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या हातावर नायलॉन स्टॉकिंग्ज ठेवण्यात आल्या होत्या.
- नायलॉन स्टॉकिंग्स प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा गंध शोषून घेण्यासाठी सहा तास थांबले.
- संशोधकांनी या नायलॉनचे तुकडे केले आणि त्यांना मादी एडिस इजिप्ती डासांच्या वेगळ्या बंद कंटेनरमध्ये ठेवले.
- संशोधकांना असे आढळून आले की इतर कंटेनरच्या तुलनेत काही कंटेनरमधील नायलॉनला डास अधिक चिकटून होते.
अभ्यासात काय आढळले?
या प्रयोगाच्या आधारे संशोधकांना असे आढळून आले की त्वचेचा वास वेगवेगळ्या डासांना आकर्षित करू शकतो. त्वचेची दुर्गंधी प्रत्यक्षात बॅक्टेरियामुळे होते. बॅक्टेरियामुळे वेगवेगळ्या लोकांच्या त्वचेचा गंध वेगळा असू शकतो. या वासाच्या आधारे डास काही लोकांना जास्त तर काहींना कमी चावतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्वचेच्या वासाच्या व्यतिरिक्त, इतर काही घटक देखील डासांच्या आकर्षणाचे कारण असू शकतात.
रक्तगट आणि डास चावणे यांच्यातील संबंध
- शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, इतर रक्तगटांच्या तुलनेत ‘ओ रक्तगट’ असलेल्या लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात.
- त्यांमुळे त्यांना हे आजार होण्याची शक्यता असते.