Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाकडून एकास अटक

November 8, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maharashtra GSt

मुक्तपीठ टीम

शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बनावट देयक देणाऱ्या करदात्या विरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी जगदीश जगन्नाथ पाटील, (वय ४८) या व्यापाऱ्यास अटक केली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी दिली.

मे. अर्णव क्रिएशन या व्यापाऱ्याचे दोन मोठे पुरवठादार मे. हेना इंटरप्रायझेस व मे. एक्सकर्सी ओव्हरसिज हे करदाते अस्तित्वात नसून बोगस आहेत व त्यांनी बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीनं नोंदणी केली आहे. या करदात्यांकडून व्यापाऱ्याने रु.७.०८ कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, असे अन्वेषण भेटीदरम्यान आढळून आले.

या प्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांनी जगदीश जगन्नाथ पाटील यांस दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात सहाय्यक राज्यकर आयुक्त अर्जुन प्रकाश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात, सहाय्यक राज्यकर आयुक्त, रमेश अवघडे, राज्यकर निरिक्षक व कर सहायक प्रज्ञा ब्रम्हांडे यांनी ही कारवाई केली. राज्यकर सह-आयुक्त अनिल भंडारी  व राज्यकर उपायुक्त मोहन बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली.

सन २०२२-२३ मध्ये खोटी देयके देवून तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करुन करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी या मोहिमेअंतर्गत आतापर्यंतची ही ४९ वी अटक आहे, असे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे कळविले आहे.


Tags: Jagdish Jagannath patilmaharashtra goods and services tax departmentजगदीश जगन्नाथ पाटीलमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग
Previous Post

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा बुधवारी पुण्यात शुभारंभ – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Next Post

तुम्हालाही जास्त डास चावतात? असं का? शास्त्रज्ञांनी शोधले कारण, जाणून घ्या….

Next Post
mosquito

तुम्हालाही जास्त डास चावतात? असं का? शास्त्रज्ञांनी शोधले कारण, जाणून घ्या....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!