मुक्तपीठ टीम
पंजाबमधील पठाणकोटमध्ये भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल बेपत्ता झाल्याची पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. सनी देओल हे गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले आहेत. पोस्टर चिकटवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, सनी देओल खासदार झाल्यानंतर कधीही गुरदासपूरला आले नाहीत.
रेल्वे स्टेशन आणि भिंतींवरही खासदार सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर्स!
- शहरातील अनेक घरे, रेल्वे स्टेशन आणि वाहनांच्या भिंतींवर खासदार बेपत्ता झाल्याचे हे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत.
- पोस्टरमध्ये लिहिले आहे, बेपत्ता व्यक्तीला शोधत आहोत… खासदार सनी देओल, गुरदासपूर.
गुरदासपूरचे लोक सनी देओलवर नाराज?
- पोस्टर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, गुरदासपूरचे लोक बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर नाराज आहेत.
- सनी देओल खासदार झाल्यापासून गुरदासपूरला आलेला नाही, असा आरोप लोक करतात. एका स्थानिक आंदोलकाने सांगितले, खासदार झाल्यानंतर सनी देओल कधीही गुरुदासपूरला गेला नाही.
- ते स्वतःला पंजाबचे सुपुत्र म्हणतात, पण त्यांनी कोणताही औद्योगिक विकास केलेला नाही. ना खासदार निधी दिला, ना केंद्र सरकारची कोणतीही योजना आणली. त्यांना काम करायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आंदोलक म्हणाले.
सनी देओलचा विरोध करणाऱ्या एका स्थानिकाने सांगितले की, “खासदार झाल्यानंतर ते कधीही गुरदासपूरला आले नाही. ते स्वतःला पंजाबचे सुपुत्र म्हणतात पण त्यांनी कोणतेही विकास काम केले नाही, निधी वाटप केला नाही, केंद्र सरकारची कोणतीही योजना येथे आणली नाही. त्यांना काम करायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.”