Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुककडून १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या डिलीट केल्या जाण्याची भीती

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
facebook

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकमधील हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. नोकरी गमावलेल्या लोकांची संख्या किमान १२ हजारांपर्यंत असू शकते असे सांगितले जात आहे. फेसबुकच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण १५ टक्के आहे. या प्रकरणाला क्वायट लेऑफ असे नाव दिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकारी खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहेत. पुढील काही आठवड्यांत कर्मचार्‍यांमध्ये १५ टक्के कपात केली जाऊ शकते. याचा अर्थ फेसबुकच्या १२ हजार कर्मचाऱ्यांना लवकरच काढून टाकले जाऊ शकते.

क्वायट लेऑफ म्हणजे काय?

  • फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, क्वायट लेऑफमधील लोकांना अशा प्रकारे काढून टाकले जाईल की हे कर्मचारी स्वतः कंपनी सोडत आहेत असे जगाला वाटेल.
  • परंतु सत्य हे असेल की त्याला कंपनीतून बाहेर काढले जात आहे.
  • गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकमधील कर्मचारी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • विशेषत: कंपनीने नोकरभरती थांबवण्याची घोषणा केल्यापासून मात्र, एवढे करूनही हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे.

सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील दिग्गज फेसबुकच्या कर्मचाऱ्यांवर काही महिन्यांपासून टांगती तलवार आहे. फेसबुकने नव्या भरतीवर बंदी घातली आहे. यानंतर, मेटाच्या शेअरची किंमत प्रति शेअर ३८० डॉलरच्या जवळ पोहोचली. गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर ६० टक्क्यांनी घसरला आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, “पुढील वर्षांपर्यंत लोक कमी करण्याची आमची योजना आहे. अनेक संघ लहान होतील. जेणेकरुन आम्ही आमची उर्जा इतर क्षेत्रात वळवू शकू. अनेक कर्मचाऱ्यांना ३० ते ६० दिवसांची नोटीस देण्यात आली आहे जेणेकरून त्यांना दुसरी नोकरी मिळेल.”


Tags: FacebookFacebook CEO Mark ZuckerbergFacebook employeesFacebook jobsmuktpeethघडलं-बिघडलंफेसबुकफेसबुक कर्मचारीफेसबुक नोकरीफेसबुक सीईओ मार्क झुकरबर्गमुक्तपीठ
Previous Post

खासदार गायब! शोधासाठी मतदारांची पोस्टरबाजी!!

Next Post

धनुष्यबाणाची लढाई! चिन्ह गोठवल्यास शिवसेना अंधेरीत कशी लढणार?

Next Post
By Elections In Andheri

धनुष्यबाणाची लढाई! चिन्ह गोठवल्यास शिवसेना अंधेरीत कशी लढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!