मुक्तपीठ टीम
वेग म्हटला की चित्ता…अतिशय वेगवान…सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या स्पोर्ट्सकारना १०० किमीचा वेग घेण्यासाठी किमान ६ सेकंद तरी लागतात, मात्र चित्ता हाच १०० किमी प्रतितासाचा वेग अवघ्या ३ सेकंदात घेऊ शकतो. पण जगातील सर्वात वेगवान मानला जाणारा चित्ता भारतातून मात्र नामशेष झाला. तसं अधिकृतरीत्या जाहीरही करण्यात आलं. आता मात्र आफ्रिकेतील नामिबिया या देशाच्या सहकार्यामुळे चित्त्यांचं भारतात पुनरागमन झालं आहे. या निमित्तानं चित्त्याविषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा हा प्रयत्न…
असा हा चित्ता…
- चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे.
- चित्ता हा चपळ आणि जलद गतीने जाणारा प्राणी आहे. तो तीन सेकंदात १०० किमी प्रतितास वेगाने धावतो.
- एवढेच नाही तर सर्वोत्तम स्पोर्ट्स कारला हा वेग गाठण्यासाठी सहा सेकंद लागतात.
- लहान डोके, सडपातळ आणि टिपके असलेले त्याचे शरीर यामुळे त्यांची चपळता दृष्टीस पडते.
- चित्त्यांचं सत्तर वर्षांनंतर देशात पुनरागमन झालं आहे.
चपळ चित्त्याबद्दल समजून घ्या १० मुद्द्यांमध्ये…
- चित्ता २३ फूटांपर्यंत तो उडी मारू शकतो.
- चित्ता धावताना दर एका सेकंदाला चार उड्या मारतो.
- चित्ता एका मिनिटापेक्षा जास्त धावू शकत नाही. ४. धावताना तो अर्धा वेळ हवेत असतो.
- चित्त्यांचं शरीर इतकं लवचिक की धावताना मागचे पायही पुढच्या पायांच्या पुढे येतात आणि त्यामुळे त्याचा वेग वाढतो.
- चित्त्यांना झाडावर कसे चढायचे ते कळत नाही.
- जगात सुमारे ७ हजार चित्ता शिल्लक आहेत, त्यापैकी बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये आढळतात.
- चित्ताचे डोळे सरळ रेषेत असतात. ज्याच्या मदतीने तो अनेक मैल दूर पाहू शकतो. यामुळे प्रचंड वेगाने धावत असतानाही तो आपल्या शिकारीवर लक्ष केंद्रित करतो.
- कान्ट रोअर चित्ता हा बिग कॅट कुटुंबातील एकमेव सदस्य आहे जो गर्जना करू शकत नाही. तो फक्त गुरगुरतो.
- चित्त्याचे हृदय सिंहाच्या हृदयापेक्षा साडेतीन पट मोठे असते. त्यामुळे धावताना त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो. ते शरीरात वेगाने रक्त पंप करते आणि त्याच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजन वाहून नेतो.
A long wait is over, the Cheetahs have a home in India at the Kuno National Park. pic.twitter.com/8FqZAOi62F
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2022
चित्ते शरीराने अगदीच हलके!
- चिता वजनाने तुलनेने हलके म्हणजे ३६ ते ६५ किलो दरम्यात असतात.
- त्यामुळे चित्ता मोठ्या जनावरांची शिकार करत नाही. परिणामी त्याला वारंवार शिकार करावी लागते.
- चित्ता डरकाळी फोडत नाही तर मांजरासारखी गुरगुर करतो.
- त्याला २ किमी दूरचा आवाज सहज ऐकता येतो. चित्त्याचे पिल्लू आठ महिन्याचे झाले की स्वतः शिकार करू लागते.
- चित्त्याच्या अंगावर दोन हजाराहून अधिक ठिपके असतात.
- त्याला रात्री कमी दिसते त्यामुळे ते दिवसाच शिकार करतात.
- त्यांचे सरासरी आयुष्य १२ वर्षे आहे.
भारत सरकारने १९५२ मध्ये अधिकृतपणे चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित केले. असे मानले जाते की याआधी देशात सुमारे १ हजार चित्ते होते. सुरगुजा छत्तीसगडमधील महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी १९४७ मध्ये देशातील शेवटच्या तीन चित्यांची हत्या केली.
चित्त्यांचं पुनरागमन!
- ७० वर्षापूर्वी भारतात नामशेष म्हणून जाहीर करण्यात आलेले चित्ते आता पुन्हा एकदा भारतात पाहायला मिळणार आहेत.
- नामिबियातून खास विमानाने ५ माद्या आणि ३ नर चित्ते आणले गेले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा दिवशी भारतात पुनरागमन झालेल्या चित्त्यांना अभयारण्यास सोडण्यात आले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्यप्रदेशच्या कुनो पालपूर अभयारण्यात चित्ते सोडले गेल आहेत.