Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प सर्वांपर्यंत पोहचवा – रवींद्र चव्हाण

September 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
ravindra chavan

मुक्तपीठ टीम

“स्वच्छ समुद्र-सुरक्षित समुद्र” अभियानात दोन ते तीन हजार युवक सहभागी होत आहेत. या युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प करावा, हा संकल्प सर्वांपर्यंत पोहोचवावा,युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षितेसाठी उचललेले पाऊल अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने मुंबईत पाच जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ अभियानातंर्गत आज सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने गिरगांव चौपाटी येथे आयोजित विशेष स्वच्छता कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. यावेळी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अनंत सिंघानिया, समीर सोमय्या, अजित मांगरुलकर, रवींद्र सांगवी, भारतीय तटरक्षक दलातील वरिष्ठ आधिकारी यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थ्यी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्राच्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे जबाबदारी नागरिकांची आहे, कोळी बांधवांशी समन्वय ठेऊन स्वच्छता आणि सुरक्षिततेवर लक्ष देणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन चव्हाण म्हणाले, राज्यात आजपासून २ ऑक्टोबर पर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून लोकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २०१४ पासून देशात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागरणाचा प्रयत्न केला आहे.

केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत देशभारातील ७५ समुद्र किनाऱ्यावर ७५ दिवसांची अभियान राबविण्यात आली. मुंबईतील गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-अक्सा, गोराई-मनोरी किनाऱ्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्थांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, गुणवंत कर्मचारी-संस्था यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.


Tags: mumbaiRavindra Chavanमुंबईरवींद्र चव्हाणस्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प
Previous Post

भारतात ‘चित्ता’ परतला! तीन सेकंदात घेतो १०० किमी प्रतितासाचा वेग!

Next Post

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Eknath Shinde (4)

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!