Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात ‘चित्ता’ परतला! तीन सेकंदात घेतो १०० किमी प्रतितासाचा वेग!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
chittah

मुक्तपीठ टीम

वेग म्हटला की चित्ता…अतिशय वेगवान…सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या स्पोर्ट्सकारना १०० किमीचा वेग घेण्यासाठी किमान ६ सेकंद तरी लागतात, मात्र चित्ता हाच १०० किमी प्रतितासाचा वेग अवघ्या ३ सेकंदात घेऊ शकतो. पण जगातील सर्वात वेगवान मानला जाणारा चित्ता भारतातून मात्र नामशेष झाला. तसं अधिकृतरीत्या जाहीरही करण्यात आलं. आता मात्र आफ्रिकेतील नामिबिया या देशाच्या सहकार्यामुळे चित्त्यांचं भारतात पुनरागमन झालं आहे. या निमित्तानं चित्त्याविषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा हा प्रयत्न…

असा हा चित्ता…

  • चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे.
  • चित्ता हा चपळ आणि जलद गतीने जाणारा प्राणी आहे. तो तीन सेकंदात १०० किमी प्रतितास वेगाने धावतो.
  • एवढेच नाही तर सर्वोत्तम स्पोर्ट्स कारला हा वेग गाठण्यासाठी सहा सेकंद लागतात.
  • लहान डोके, सडपातळ आणि टिपके असलेले त्याचे शरीर यामुळे त्यांची चपळता दृष्टीस पडते.
  • चित्त्यांचं सत्तर वर्षांनंतर देशात पुनरागमन झालं आहे.

चपळ चित्त्याबद्दल समजून घ्या १० मुद्द्यांमध्ये…

  • चित्ता २३ फूटांपर्यंत तो उडी मारू शकतो.
  • चित्ता धावताना दर एका सेकंदाला चार उड्या मारतो.
  • चित्ता एका मिनिटापेक्षा जास्त धावू शकत नाही. ४. धावताना तो अर्धा वेळ हवेत असतो.
  • चित्त्यांचं शरीर इतकं लवचिक की धावताना मागचे पायही पुढच्या पायांच्या पुढे येतात आणि त्यामुळे त्याचा वेग वाढतो.
  • चित्त्यांना झाडावर कसे चढायचे ते कळत नाही.
  • जगात सुमारे ७ हजार चित्ता शिल्लक आहेत, त्यापैकी बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये आढळतात.
  • चित्ताचे डोळे सरळ रेषेत असतात. ज्याच्या मदतीने तो अनेक मैल दूर पाहू शकतो. यामुळे प्रचंड वेगाने धावत असतानाही तो आपल्या शिकारीवर लक्ष केंद्रित करतो.
  • कान्ट रोअर चित्ता हा बिग कॅट कुटुंबातील एकमेव सदस्य आहे जो गर्जना करू शकत नाही. तो फक्त गुरगुरतो.
  • चित्त्याचे हृदय सिंहाच्या हृदयापेक्षा साडेतीन पट मोठे असते. त्यामुळे धावताना त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो. ते शरीरात वेगाने रक्त पंप करते आणि त्याच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजन वाहून नेतो.

A long wait is over, the Cheetahs have a home in India at the Kuno National Park. pic.twitter.com/8FqZAOi62F

— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2022

चित्ते शरीराने अगदीच हलके!

  • चिता वजनाने तुलनेने हलके म्हणजे ३६ ते ६५ किलो दरम्यात असतात.
  • त्यामुळे चित्ता मोठ्या जनावरांची शिकार करत नाही. परिणामी त्याला वारंवार शिकार करावी लागते.
  • चित्ता डरकाळी फोडत नाही तर मांजरासारखी गुरगुर करतो.
  • त्याला २ किमी दूरचा आवाज सहज ऐकता येतो. चित्त्याचे पिल्लू आठ महिन्याचे झाले की स्वतः शिकार करू लागते.
  • चित्त्याच्या अंगावर दोन हजाराहून अधिक ठिपके असतात.
  • त्याला रात्री कमी दिसते त्यामुळे ते दिवसाच शिकार करतात.
  • त्यांचे सरासरी आयुष्य १२ वर्षे आहे.

भारत सरकारने १९५२ मध्ये अधिकृतपणे चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित केले. असे मानले जाते की याआधी देशात सुमारे १ हजार चित्ते होते. सुरगुजा छत्तीसगडमधील महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी १९४७ मध्ये देशातील शेवटच्या तीन चित्यांची हत्या केली.

चित्त्यांचं पुनरागमन!

  • ७० वर्षापूर्वी भारतात नामशेष म्हणून जाहीर करण्यात आलेले चित्ते आता पुन्हा एकदा भारतात पाहायला मिळणार आहेत.
  • नामिबियातून खास विमानाने ५ माद्या आणि ३ नर चित्ते आणले गेले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा दिवशी भारतात पुनरागमन झालेल्या चित्त्यांना अभयारण्यास सोडण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्यप्रदेशच्या कुनो पालपूर अभयारण्यात चित्ते सोडले गेल आहेत.

Tags: africaChittahIndiaआफ्रिकाचित्ताभारत
Previous Post

अंबानींनंतर टाटांनाही मागे टाकत अदानी आणखी पुढे! कसे आणि किती जाणून घ्या…

Next Post

स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प सर्वांपर्यंत पोहचवा – रवींद्र चव्हाण

Next Post
ravindra chavan

स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प सर्वांपर्यंत पोहचवा - रवींद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!