मुक्तपीठ टीम
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता आहे. नव्या मंत्रिमंडळात ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे, त्यापैकी बहुतांश भाजपाचे असतील. भाजपाच्या २५ आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १३ मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपक्ष आमदारांनाही मंत्री केलं जाऊ शकतं. मंत्री बनवताना भाजपा अमित साटम, योगेश सागर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.
भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी!!
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकूण ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे.
- यामध्ये २५ मंत्री भाजपाचेतर १३ मंत्री हे एकनाथ शिंदे गटाचे असतील.
- भाजपा पक्षाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
- भाजपा गृहखातं, अर्थखातं, महसूल खातं ही खाती स्वत:कडेच ठेवणार आहे.
- आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे भाजपाच्या अनेक अनुभवी नेत्यांचा विरस होणार आहे.
- भाजपा मुंबईतील अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम, कांदिवलीचे आमदार योगेश सागर, धनगर नेते गोपीचंद
- पडळकर यांच्यासारख्या नेत्यांना संधी देण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाला तीनमागे एक, भाजपाला चारमागे एक!
- शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भाजपा यांच्यात फॉर्म्युला निश्चित होत आहे.
- शिवसेनेला प्रत्येक तीन आमदारांमागे एक आणि भाजपाला प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या संभाव्य अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.