Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सत्ताकारणासाठी चार्टड विमानं आणि पालघरच्या आजारी महिलेला चादरीच्या डोलीतून रुग्णालयात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
charted flights for power politics, but no ambulance for tribal woman

मुक्तपीठ टीम

पालघर जिल्ह्यातील गाव–पाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटली तरीही ग्रामीण भागातील उपेक्षा अजूनही संपलेली दिसत नाही. मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी आजही मोठ्या जिकरीचा सामना करावा लागत आहे. एका महिलेची अचानक तब्येत बिघडल्याने भर पावसात गावातील चार तरुणांनी प्लास्टिक आणि चादरीतून तिला रुग्णालयात दाखल केले. संबंधित घटना भीषण असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Palghar (3)

मोखाड्यातील मरकटवाडी पाडा येथे ६ जुलै रोजी सकाळी अचानक सुंदर किरकिरे या महिलेची प्रकृती खालावली. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता आणि गावापर्यंत रस्ता नसल्याने कुटुंबासह गावकऱ्यांची ही तारांबळ उडाली. आता सुंदर यांना रुग्णालयात न्यायचे तरी कसे हा प्रश्नच होता. शेवटी गावातील चार तरुणांनी प्लास्टिक आणि चादरीची डोली तयार केली. भरपावसात चार किमीचा दरी पायपीट करत महिलेला मुख्यरस्त्यापर्यंत आणले. यानंतर तिथून वाहनाने सुंदर यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Palghar (2)

याआधी पालघरमध्ये गरोदर माता आणि रुग्णांची रस्त्यांअभावी उपचारासाठी तारांबळ!

  • जव्हार तालुक्यातील झाप मनमोहाडी येथील गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या.
  • गावापर्यंत रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी गर्भवती महिलेला चादरीच्या डोलीत घेऊन हा डोंगर पार केला.
  • जवळपास ७ ते ८लकिमी डोंगर चढून पायी प्रवास करत झाप येथील आरोग्य सबसेंटर येथे
    त्या गरोदर मातेला प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु त्या आरोग्य सबसेंटर पुरेशा सुविधा अभावी जव्हार येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
  • Palghar (1)

मुंबई पासून मोखाडा हे अंतर १४० किमी आहे.

पालघरमधील खेडेगावात बालमृत्यू आणि माता मृत्यूंचे प्रमाणही जास्त आहे मात्र या सगळ्याकडे प्रशासन आणि सरकार लक्ष कधी देणार असा सवाल उपस्थित केला जातोय. ठाण्याचे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाले असून आता तरी मुंबई, ठाण्यालगतच्या या आदिवासी पाड्यात प्राथमिक सुविधा उपलब्ध होतील का, असा प्रश्न  ग्रामस्थ विचारत आहेत.

 

Palghar (4)


Tags: charted FlightsPalgharpoliticiansपालघर
Previous Post

भाजपा आणि शिंदे गटात कशी होणार सत्तेची वाटणी? साटम, सागरांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी!

Next Post

नोटाबंदीत रद्द झालेल्या नोटांची ५ वर्षांनंतरही खरेदी-विक्री! कोणाचा धंदा?

Next Post
Two people bought old currency notes worth 62 lakhs in Delhi

नोटाबंदीत रद्द झालेल्या नोटांची ५ वर्षांनंतरही खरेदी-विक्री! कोणाचा धंदा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!