मुक्तपीठ टीम
नोएडामध्ये डिजिटल बलात्काराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ८० वर्षांच्या वृद्ध चित्रकाराने आपल्या अल्पवयीन मोलकरणीवर गेली सात वर्ष डिजिटल बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चित्रकाराला अटक केली आहे. कलम ३७६, ३२३, ५०६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान डिजिटल बलात्कार असतो तरी काय? जाणून घेऊया…
डिजिटल बलात्कार म्हणजे नेमकं काय?
- डिजिटल बलात्कार म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मुलगी किंवा मुलाचे शोषण नाही.
- इंग्रजीमध्ये डिजिट म्हणजे अंक, तसेच बोट, अंगठा, पायाचे अंगठे यांसारख्या शरीराच्या अवयवांनाही डिजिट म्हणून संबोधले जाते.
- त्यामुळे जो लैंगिक छळ शरीराच्या बोटांसारख्या अवयवांनी केला जातो, त्याला डिजिटनं केलेला डिजिटल बलात्कार म्हणतात.
- निर्भया प्रकरणानंतर डिजिटल रेपमध्येही अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे.
- नोएडाच्या प्रकरणातील आरोपी चित्रकार पॉर्न दाखवत त्या मुलीच्या लैंगिक अवयवांशी बोटांनी घाणेरडे स्पर्श करत असे.
नेमकं प्रकरण काय?
- अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, मूळचा प्रयागराजचा रहिवासी, चित्रकार मॉरिस रायडर हा सेक्टर ४६ मध्ये एका महिला मैत्रिणीसोबत राहतो.
- या महिला मैत्रिणीच्या संरक्षणात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी देखील राहाते.
- ही मुलगी घरात मोलकरीन म्हणून काम करते.
- गेल्या अनेक वर्षांपासून मॉरिस राइडर आपल्यावर लैगिक शोषण करत असल्याचा पीडितेचा आरोप आहे.
- पीडितेने सांगितले की, ती दहा वर्षांची होती तेव्हापासून येथे राहात आहे.
- अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, पीडितेने पोलिसांना आरोपीचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देखील दिले आहे.
- पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३२३, ५०६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.