मुक्तपीठ टीम
वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांनाही त्या महागाईचा सामना करावा लागत आहे. पण वस्तूंचे भाव वाढवले तर ग्राहक दुरावण्याची भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांनी एक वेगळीच चलाखी केली आहे. उत्पादने महाग करण्याऐवजी ते वजन कमी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वस्तू जुन्या किंमतीतच मिळत असल्या तरी त्यांचे वजन झालं आहे. म्हणजे पॅकची किंमत तीच पण आतील वस्तूंचे प्रमाण मात्र कमी!
दररोज वापरल्या जाणार्या उत्पादनांवर परिणाम
- महागाईचा सर्वाधिक फटका बिस्किटे, चिप्स, छोटे साबण, चॉकलेट्स आणि नूडल्स या उत्पादनांना बसत आहे.
- ही उत्पादने दररोज घरांमध्ये वापरली जातात.
- पार्ले प्रोडक्ट्सचेही बिस्किट आणइ अन्य कमी वजनाचे पॅक जास्त विकले जात आहेत.
- इमामीच्या एकूण व्यवसायात लहान पॅकचा वाटा २४% आहे.
- ब्रिटानियाने सांगितले की, ५ आणि १० रुपयांची उत्पादने त्यांच्या व्यवसायात ५० ते ५५ टक्के योगदान देतात.
किंमत तीच, वजन मात्र कमी!
- हल्दीरामने आलू भुजियाच्या पॅकचे वजन ५५ ग्रॅमवरून ४२ ग्रॅम केले आहे.
- पार्ले जीने ५ रुपयांच्या बिस्किटांचे वजन ६४ ग्रॅमवरून ५५ ग्रॅम
- तर विम बारचे वजन २० ग्रॅमने कमी केले आहे. ते आता १५५ ऐवजी १३५ ग्रॅम झाले आहे.
- बिकाजीने नमकीनचे १० रुपये किंमतीचे पाकीट अर्ध्यावर ठेवले आहे.
- पूर्वी ते ८० ग्रॅमचे होते ते आता ४० ग्रॅम झाले आहे. बहुतेक कंपन्यांनी हँडवॉशचे वजन २०० मिली वरून १७५ मिली पर्यंत कमी केले आहे.
- १ ते १० रुपयांचे छोटे पॅक बहुतेक एफएमसीजी कंपन्यांच्या व्यवसायात २५ ते ३५ टक्के योगदान देतात. ते मोठ्या पॅकच्या किंमती वाढवतात, परंतु लहान पॅकच्या किंमती वाढवणे हा तोटा असेल.
शहरांमध्ये भाववाढ, खेड्यांमध्ये वजन कमी!
- डाबर इंडियाने म्हटले आहे की, शहरी भागात ग्राहक जास्त पैसे देऊ शकतात, जिथे उत्पादने महाग झाली आहेत.
- १ रुपये, ५ रुपये आणि १० रुपयांचे पॅक येथे अधिक विकले जात असल्याने गावांमध्ये पॅकेटचे वजन कमी झाले आहे.
- सध्याच्या काळात महागाई वाढल्यामुळे, कंपन्या आता ब्रिज पॅक देखील सादर करत आहेत, ज्याचा अर्थ दोन किंमतीची उत्पादने एकत्र करणे.