मुक्तपीठ टीम
पुण्यातील नामांकित रूबी हॉल क्लिनिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकमधील १५ डॉक्टरांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ लाख रुपयांच्या आमिषाने एका महिलेने किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्चमध्ये उघड झाला होता. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. या चौकशीत संपुर्ण प्रकरणाचा छडा लागला.
नेमकं प्रकरण काय?
- अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
- साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली.
- १५ लाख रुपये मिळाले नाही म्हणून या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती.
- त्यानंतर किडनी तस्करीचा प्रकार उघड झाला होता.
- पैशांसाठी किडनी विकलेल्या महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे.
पोलीस चौकशीत काय निष्पन्न झाले?
- पोलीसांना चौकशीत सारिका सुतार या महिलेची १५ लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते असे आढळले.
- त्यासाठी सारिका सुतार यांची बनावट नावाने कागदपत्रं तयार करण्यात आली.
- मात्र सारिका सुतार यांना ठरल्याप्रमाणे १५ लाख न देता चार लाखांवर त्यांची फसवणुक करण्यात आली आणि म्हणून त्यांनी तक्रार दिल्याचे पोलीसांना चौकशीत आढळून आलं.
- ही फसवेगिरी करण्यात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापनातील अधिकारी देखील त्यामधे सहभागी असल्याच पोलीसांना चौकशीत आढळून आलं.
- त्यानंतर पोलीसांनी सर्वांच्याच विरोधात गुन्हा नोंद केला.
- आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.