मुक्तपीठ टीम
कॉलेज जीवन म्हटलं की प्रत्येकाला आवडतंच आवडतं. त्यातही फेस्टिव्हल, स्पर्धा म्हटलं तरुणाईच्या उत्साहाला उधाण येतं. पनवेलमधील एमिटी युनिव्हर्सिटीत टेक्निशिया स्पर्धेत ड्रोन, रिमोट कार्सचा थर्रार रंगला. त्या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद लाभला. एमिटी युनिव्हर्सिटी, मुंबईत ‘टेक्निशिया २०२२’ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुमारे २५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. करोनाचे निर्बंध उठल्यानंतर कॅम्पसमध्ये पहिल्यांदा ही मोठी स्पर्धा घेण्यात आली. टेक्निशिया २०२२ मध्ये कार रेसिंग, ड्रोन रेसिंग, एरोफिलीयासहित स्टार्टअप प्रेजेन्टेशन, बुघ्दीबळ सारख्या एकूण अठ्ठावीस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचं आयोजन एमिटी स्कूल ऑफ इंजिनियरींग एन्ड टेक्नोलॉजीतर्फे करण्यात आलं होतं. उदघाटनाला प्रमुख पाहुणे होते डॉ. बी. अथीयान. जे भारत सरकारच्या सुपर कम्पुटींग विभागाचे प्रमुख आहेत. “फक्त इंजिनियरींगच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी टेक्निशिया २०२२ मघल्या स्पर्धा फायद्याच्या ठरतीलच. पण मशीन लर्निंग आणि आर्टीफिशियल इंटेलिजेन्सचा वापर सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी व्हायला हवा हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावं.” असं मत बी अथीयान यांनी यावेळी मांडलं.
टाटा स्टीलच्या खोपोली युनिटचे प्रमुख ब्रजेश नाहर यांनी ही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. टेक्निशिया २०२२चं उदघाटन कुलगुरु लेफ्टनंट जनरल व्हि के शर्मा आणि प्र-कुलगुरु ए डब्ल्यू संथोशकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. श्रीकांत चरहाटे, संचालक, एमिटी स्कूल ऑफ इंजिनियरींग एन्ड टेक्नोलॉजी यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निशिया २०२२ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची आखणी करण्यात आली होती. एमिटी युनिव्हर्सिटीतर्फे दरवर्षी टेक्निशियाचं आयोजन करण्यात येतं.